Viral Video: देवीच्या मंडपात नातेवाईकांना पाहताच काजोलला रडू कोसळले

Bollywood actress kajol breaks down after meet her uncles at durga puja pandal video viral
Viral Video: देवीच्या मंडपात नातेवाईकांना पाहताच काजोलला रडू कोसळले

बॉलिवूडमध्ये काजोल आपल्या बबली स्टाईलसाठी जास्त ओळखली जाते. तिची ही स्टाईल लोकांना खूप आवडते. सध्या काजोल जास्त कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसत नसली तरी ती सोशल मीडियावरून आपले लटेस्ट फोटो शेअर करत असते. नुकताच काजोलने साडीमधला एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सध्या काजोल एका व्हिडिओमुळे काजोल चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यामध्ये ती देवीच्या मंडपात नातेवाईकांना पाहून रडताना दिसत आहे. काजोलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Bollywood actress kajol breaks down after meet her uncles)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलचा हा व्हिडिओ बॉलिवूड फोटोग्राफर वीरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना वीरलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘देवीच्या मंडपात जेव्हा काजोल आपल्या काकांना भेटली, तेव्हा ती स्वतःला सांभाळू शकली नाही आणि ती इमोशनल झाली.’ वीरलच्या या कॅप्शननुसार, खूप दिवसांनंतर काजोल आपल्या काकांना भेटली होती. कारण तिचे काका कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. अशा परिस्थिती उपचारदरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोर जावे लागले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. अशा वेळी जेव्हा काजोल त्यांना भेटली तेव्हा तिला दुःख अनावर झाले आणि ती रडू लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, काजोलने नवरात्रीनिमित्ताने लाल रंगाची साडी घातली आहे. आपल्या काकांच्या मिठीमध्ये काजोल रडताना दिसत असून तिला काका शांत करत आहेत.


हेही वाचा – Sonam Kapoorच्या पतीच्या कपड्यांच्या ब्रँडचे फोटोशूट पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्ये, पाहा व्हायरल फोटो