Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी सीतेच्या भूमिकेसाठी आता करिनाच्या जागी 'या' अभिनेत्रीची चर्चा

सीतेच्या भूमिकेसाठी आता करिनाच्या जागी ‘या’ अभिनेत्रीची चर्चा

सीतेची भूमिका कंगनाच्याचं नावे होती

Related Story

- Advertisement -

सीता- द इनकार्नेशन (Sita- The Incarnation) या पौराणिक सिनेमात सीतेच्या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्री बेबो म्हणजेच करिना कपूर खान (Kareena kapoor khan ) हिला घेण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही चर्चा रंगताच त्यासंबंधी वाद निर्माण झाला आणि थोड्या वेळात करिनाच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. करिना कपूर खान सीता मातेची भूमिका कशी साकारु शकते. तिने एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले आहे. त्यात ती दोन मुलांची आई आहे. करिना कपूर जर सीता मातेची भूमिका साकारणार असेल तर हा सिनेमा होऊ देणार, याविरोधात आंदोलन करु अशा तीव्र प्रतिक्रीय आणि इशारा बंजरंग दलाने दिला होता. मात्र आता सीता मातेच्या भूमिकेसाठी करिनाचा पत्ता कट करुन अभिनेत्री कंगना रणौतची चर्चा सुरु झाली आहे. सिनेमाच्या निर्मांत्यानी करिना ऐवजी कंगनाची सीतेच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ( Bollywood actress kangana ranaut replace of Kareena kapoor khan for the role of Sita)

- Advertisement -

सिनेमाच्या लेखक के. व्हि.विजयेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीपासूनच सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री कंगाना रणौतचे नाव घेतले गेले होते. सीतेची भूमिका कंगनाच्याचं नावे होती. यासगळ्यात करिना कपूरची एंट्री कशी झाली याबाबत काहीही माहिती नाही. आम्ही कधीही कंगनाशी सीतेच्या भूमिकेसाठी संपर्क साधला नसल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेत्री कंगना रणौतची सीतेच्या भूमिकेसाठी निवड झाल्याची चर्चा सुरु होताच कंगनाच्या फॅन्समध्ये उत्साह दिसून येत आहे. निर्मात्यांनी मात्र सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री कंगना रणौतची निवड केल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

करिना कपूरचे बिकनीतील फोटो आणि अजमेर दर्ग्याला गेलेली तेव्हाचे फोटो जोडून करिना कपूरच्या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर सोशल मीडियावर #Boycottkareenakapoorkhan ट्रेंड केले जात होते.


- Advertisement -

हेही वाचा – शहनाजच्या वागणुकीवर नेटकरी संतापले,म्हणाले आता एवढी चर्बी आली का?

 

 

- Advertisement -