Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कंगनाचं ज्ञान ऐकून नेटकरी वैतागले, बाई खोट बोलते म्हणत केलं ट्रोल

कंगनाचं ज्ञान ऐकून नेटकरी वैतागले, बाई खोट बोलते म्हणत केलं ट्रोल

व्हिडिओ पाहून नेटकरी वैतागले आणि कंगनाला जबरदस्त शब्दात सुनावले

Related Story

- Advertisement -

प्रत्येक विषयात आपले मत मांडून सतत चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. याआधीही कंगनाच्या आगाऊ वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलेय. मात्र कंगनाला त्याचा काहीच फरक पडत नसल्याचे कित्येक वेळा सिद्ध झाले आहे. आता मात्र विषय कोरोनाचा असल्याचे नेटकऱ्यांनी कंगनाला चांगलेच सुनावल आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती सध्या सुरु असलेल्या कोरोना परिस्थितीविषयी ज्ञान देत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी वैतागले आणि कंगनाला जबरदस्त शब्दात सुनावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


कंगनाने लसीकरणसंदर्भात जनजागृती करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती असे म्हणत आहे की, ‘कोरोना महामारीमुळे सर्वामध्ये नकारात्मकता आहे. मात्र ही वेळ नकारात्मक होण्याची नाहीय. लस घेऊन पॉझिटिव्ह राहण्याची आहे. प्रत्येकाने लगेच रजिस्ट्रेशन करा मी ही केले आहे’. कंगनाच्या या व्हिडिओनंतर ती सरकारची पाठराखण करत आहे असे अनेकांनी म्हटले आहे. राजकीय नेत्यांचे मोर्चे,प्रचार रॅलीच्या वेळी कंगनाने असे व्हिडिओ का नाही बनवले असा प्रश्न नेटकरी कंगनाला विचारत आहे.

- Advertisement -

काही युझर्सने असे म्हटले आहे की, ‘बाई खोटं बोलतेय,अजून रजिस्ट्रेशन आणि लस सुरु झाली नाही. देशात लसीचा तुटवडा आहे’. त्याचप्रमाणे काहींनी असे म्हटले आहे की, देशाची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे, लस हे एक औषध आहे, लसीच्या पहिल्या डोसात शंभर टक्के रिकव्हरी होतेय, कंगनाला मित्रही आहेत, कंगनाने सांगितलेल्या या चार गोष्टी लक्षात ठेवा,असे म्हणत कंगनावर नेटकऱ्यांनी मिम्स तयार केले आहेत. याआधीही कंगनाला ऑक्सिजन सिलेंडरच्या बाबतीत सरकारच्या बाजूने बोलल्याने ट्रोल करण्यात आले होते.


- Advertisement -

हेही वाचा – आराध्यमध्ये लोक ऐश्वर्याचे सौंदर्य शोधतात, जय्या बच्चन यांची नातीसाठीची कमेंट चर्चेत

- Advertisement -