कंगनाने १० दिवसांत ५ किलो वजन केलं कमी, जाणून घ्या Diet Plan

bollywood actress kangana ranaut weight loss diet and workout plan
कंगनाने १० दिवसांत ५ किलो वजन केलं कमी, जाणून घ्या Diet Plan

बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्विन कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. कंगना जितनी मेहनत एखाद्या भूमिकेसाठी घेते, तितकीच मेहनत ती आपल्या फिटनेससाठी घेते. कंगनाने आपल्या ‘पंगा’ आणि ‘थलायवी’ चित्रपटासाठी खूप वजन वाढवले होते. परंतु ज्याप्रकारे तिने वजन वाढवले, त्याच वेगात तिने वजन कमीही केले. तिने आपल्या जुन्या लूकमध्ये येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. कंगनाने फक्त १० दिवसांत ५ किलो वजन कमी केले आहे.

माध्यमाच्या वृत्तानुसार, कंगनाने आपले वजन कमी करण्यासाठी पिलट्स केले आहे. याशिवाय तिने वर्कआऊटच्या दुसऱ्या फॉर्मवर देखील काम केले आहे. आपल्या शरीराला पहिल्यासारखे टोन्ड केले आहे. याव्यतिरिक्त कंगना फिट राहण्यासाठी योगा आणि डान्स पण करते. एवढेच नाहीतर आपले मन शांत ठेवण्यासाठी कंगनाला मेडिटेशन करायला खूप आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

कंगना परफेक्ट फिगर ठेवण्यासाठी फक्त वर्कआऊट नाही तर यासाठी व्यवस्थित डाएट देखील करते. आपले वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान कंगनाने तेलकट आणि जंकफूड दूर ठेवले होते. विशेष म्हणजे तिने आपल्या रात्रीचे जेवणावर कंट्रोल ठेवले होते. यामुळे कंगना आपले रात्रीचे जेवण ८ वाजण्याच्या अगोदर करते. रात्रीच्या जेवणात कंगना व्हेजिटेबल सूप, सॅलेड आणि उकडलेल्या भाज्या खाते.


हेही वाचा – वर्षभर लपवली लग्नाची बातमी, विक्रम भट्ट ५२ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत