घरट्रेंडिंग'या' महिन्यात हलणार करिना आणि सैफच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा

‘या’ महिन्यात हलणार करिना आणि सैफच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा

Subscribe

सैफ आणि करिना त्यांच्या दुसऱ्या बाळाला लाइमलाइटपासून दूर ठेवणार आहेत. पण करिना आणि सैफच्या घरी हा दुसरा नवा पाहुणा कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी प्रेग्नंसीच्य बातम्या दिल्या. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्कालाही कन्यारत्न प्राप्त झाले. अनुष्कानंतर आता अभिनेत्री करिना कपूर खान हिच्या बाळाची सर्व वाट पाहत आहे. २०२० मध्ये करिनाने ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची घोषणा केली. करिना दुसऱ्यांदा आई होणार असल्याने करिना आणि सैफ दोघेही खूप खुश आहेत. सैफ करिनाच्या पहिल्या बाळाची तैमूरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. तैमूरमुळे सैफ आणि करिनाला अनेकदा ट्रोलही करण्यात आले होते. तैमूर नेहमीच लाइमलाईटमध्ये राहिला आहे. मात्र सैफ आणि करिना त्यांच्या दुसऱ्या बाळाला लाइमलाईटपासून दूर ठेवणार आहेत. पण करिना आणि सैफच्या घरी हा दुसरा नवा पाहुणा कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

- Advertisement -

करिना प्रेग्नंसीच्या काळात खूप आनंदी असल्याचे दिसून आले आहे. करिना आठ महिन्यांची प्रेग्नंट आहे. प्रेग्नंसीच्या काळाच फिट राहण्यासाठी करिना अनेक योगासने करतानाही दिसत आहे. तिचे योगासन करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याबद्दल करिच्या चाहत्यांनी तिचे कौतुकही केले होते. मात्र करिनाला या फोटोंमुळे ट्रोलही करण्यात आले आहे. देशात ६३ टक्के महिला प्रेग्नंसीच्या काळात काम करतात. यांनी योगा केला तर त्यात काय मोठी गोष्ट आहे, असे ट्रोलर्स म्हणत आहेत.

- Advertisement -

करिनाचे बेबी बंप मधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करिना आधी प्रेगा न्यूज कंपनीची ब्रॅड एम्बेसेडर होती. मात्र नंतर अभिनेत्री अनुष्का शर्माला ब्रॅड एम्बेसेडर करण्यात आले. यामुळेही अनेक चर्चा रंगल्या होत्या. तैमूरचा छोटा भाऊ किंवा बहिण येत्या फेब्रुवारी महिन्यात जन्माला येणार आहे. सैफ आणि करिनाच्या घरी फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे.


हेही वाचा – ‘त्या’ फोटोमुळे नेटकऱ्यांनी बेबोला सुनावले; नेटकरी म्हणाले

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -