घरमनोरंजनDon 3 : 'डॉन 3' मध्ये 'या' अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री

Don 3 : ‘डॉन 3’ मध्ये ‘या’ अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री

Subscribe

फरहान अख्तरने डॉन 3’ची घोषणा केल्यानंतर सगळेच फार उत्सुक झाले होते. चाहत्यांची ही उत्सुकता मात्र एका क्षणात रागात बदलली जेव्हा या तिसऱ्या भागात मुख्य भूमिकेसाठी रणवीर सिंहला घेतल्याचं स्पष्ट झालं. प्रेक्षकांना या भूमिकेसाठी रणवीरची निवड अजिबात पटलेली नसून त्यांनी यावर टीका देखील केली. रणवीर सिंहच्या एन्ट्रीनंतर त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री काम करणार याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागले होते.बऱ्याच अभिनेत्रींची नावं समोर आली होती. ‘डॉन’ची जंगली बील्ली म्हणजेच प्रियांका चोप्रा या तिसऱ्या भागात दिसणार अशीही चर्चा होती. आता या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

एक्सेल मुव्हीने कियारा आडवाणीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. कियारा आडवाणीचं डॉन युनिव्हर्समध्ये स्वागत… असे कॅप्शन देण्यात आले आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘डॉन 3’ मध्ये कियाराच्या एन्ट्रीने चाहते खूश झाले आहेत. चाहत्यांनी या चित्रपटात तू आपली छाप सोडशील असे म्हटले. तर, एकाने  ‘वेलकम डॉनची डार्लिंग  कियारा अडवाणी. अन्य एका चाहत्याने सिनेसृष्टीत तुझ्यासारखी कोणी नाही असे म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

- Advertisement -

कियारानं शेअर केली पोस्ट

कियारानं देखील डॉन-3 या चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, “आयकॉनिक डॉन फ्रँचायझीचा भाग होण्याचा आणि या टीममध्ये करण्याचा काम करण्याचा आनंद होत आहे. आम्ही एकत्र या रोमांचक प्रवासाला निघालो आहोत, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा.”

- Advertisement -

मोठ्या पडद्यावर दिसणार रणवीर-कियाराची केमिस्ट्री 

प्रेक्षक या धमाकेदार ब्लॉकबस्टर जोडीला एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी फारच उत्सुक असल्याचं त्यांनी कॉमेंट करत लिहिलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर आणि कियारा प्रथमच स्क्रीन शेअर करणार आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. हा नव्या पिढीचा डॉन असल्याने यामध्ये शाहरुख ऐवजी नवा तरुण चेहेरा घेतल्याचं मध्यंतरी फरहानने स्पष्ट केलं होतं. आता कियाराच्या एंट्रीने प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री कशी असेल हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

रणवीर झाला बॉलिवूडचा तिसरा डॉन

अमिताभ बच्चन यांनी 1978 मध्ये रिलीज झालेल्या चंद्रा बारोट दिग्दर्शित डॉन या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली. या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या 2006 मध्ये रिलीज झालेल्या डॉन चित्रपटात शाहरुख खाननं डॉनची भूमिका साकारली. 2011 मध्ये रिलीज झालेल्या डॉन 2 चित्रपटामध्ये देखील शाहरुखनेच डॉनची भूमिका साकारली. आता डॉन-3 चित्रपटामध्ये रणवीर सिंह डॉन ही भूमिका साकारणार असून तो आता बॉलिवूडचा तिसरा डॉन ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -