Thursday, March 4, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'बच्चन पांडे'मधील क्रिती आणि अक्षयचा जबरदस्त लूक

‘बच्चन पांडे’मधील क्रिती आणि अक्षयचा जबरदस्त लूक

Related Story

- Advertisement -

साजिद नाडियाडवालाचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’वर सध्या प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय आणि क्रितीचा या चित्रपटातील जबरदस्त लूक क्रिती सेनॉनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान अक्षय कुमारसोबत क्रितीचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. याबद्दलची माहिती क्रिती चाहत्यांसोबत सोशल मीडियावरद्वारे दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय आणि क्रितीच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. क्रितीने या चित्रपटातील अक्षय कुमारसोबत लूक शेअर करून लिहिले आहे की, ‘माझ्या या चित्रपटातील अक्षय कुमारसोबतचा प्रवास संपला आहे. ‘बच्चन पांडे’ शेड्यूल हे माझ्या आयुष्यात कमालीचे होते. शूटिंग दरम्यानची मस्ती ते खेळ आणि जेवणाच्या वेळेतील तो आनंद घेतानाचा हे शूटिंग कधी संपले कळालेच नाही. आम्ही एकत्र कुटुंब झालो होते. आता थेट भेटूया चित्रपटगृहात.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

माहितीनुसार ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील जैसलमेरमध्ये शूटिंग झाले. या चित्रपटात अक्षय आणि क्रिती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी आणि अरशद वारसी देखील दिसणार आहेत. २०२१ मध्ये ‘बच्चन पांडे’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.


हेही वाचा – मानधन थकवल्याच्या आरोपानंतर मंदार देवस्थळींनी मागितली माफी


- Advertisement -

 

- Advertisement -