Madhuri Dixit Birthday: माधुरीची डॉ. नेनेंसोबत ‘अशी’ सुरू झाली प्रेमकहाणी

माधुरीची आणि नेनेंची जोडी पाहून चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली, या प्रश्नाचे उत्तर माधुरीने एका मुलाखतीत दिले.

Bollywood Actress Madhuri Dixit Birthday this is how Madhuri and Dr Nene s love story started
Bollywood Actress Madhuri Dixit Birthday this is how Madhuri and Dr Nene s love story started

Madhuri Dixit Birthday: धक-धक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. आज ती तिचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबईत झाला.

या अभिनेत्रीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही लोकांना भूरळ आहे. अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी कथक शिकण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 8 व्या वर्षी रंगमंचावर पहिला परफॉर्मन्स दिला. आज तिच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी जाणून घ्या, ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत.(Bollywood Actress Madhuri Dixit Birthday this is how Madhuri and Dr Nene s love story started )

या चित्रपटातून करिअरची सुरुवात

आपल्या मनमोहक हास्याने लोकांची मने जिंकणाऱ्या माधुरी दीक्षितने 1984 मध्ये अबोध चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण हा चित्रपट फ्लॉप झाला आणि तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. पण 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेजाब या चित्रपटाने तिचं नशिब चमकलं आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही आणि इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले.

अशा सुरु झाली माधुरी आणि डॉ.श्रीराम नेने यांची प्रेमकहाणी

17 ऑक्टोबर 1999 रोजी माधुरी दीक्षितने लाखो चाहत्यांची मने तोडून डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. तिची आणि नेनेंची जोडी पाहून चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली, या प्रश्नाचे उत्तर माधुरीने एका मुलाखतीत दिले.

तिने सांगितले की, डॉ. श्रीराम नेनेंशी माझी पहिली भेट योगायोगाने भावाच्या पार्टीत (लॉस एंजेलिस) मध्ये झाली. मी एक अभिनेत्री आहे आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहे हे श्रीराम नेने यांना माहित नव्हते आणि हे समजल्यावर मला आश्चर्य वाटले.

माधुरी पुढे म्हणाली, ‘आमच्या भेटीनंतर डॉ. नेने यांनी मला विचारले होते की, तू माझ्यासोबत डोंगरात बाईक राईडला येशील का? मला वाटलं ठीक आहे, डोंगर आहेत आणि बाईक देखील आहे. पण डोंगरावर गेल्यावर कळले की ते अवघड आहे.” तिथेच आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि प्रेमात पडलो. त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

( हेही वाचा: आठवड्याला 10 सिनेमे येणार असतील तर… मराठी सिनेमांच्या प्रश्नावर राज यांचा उलट सवाल )

इतक्या संपत्तीची माधुरी आहे मालकीण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती सुमारे 250 कोटी आहे. अभिनेत्री एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय ती रिअॅलिटी शोला जज करण्यासाठी एका सीझनसाठी 24-25 कोटी रुपये फी घेते. माधुरी लक्झरी वाहनांचीही शौकीन आहे. त्याच्या वाहनांच्या यादीत व्हाईट ऑडी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, रोल्स रॉयस आणि स्कोडा रॅपिड यांचा समावेश आहे.