Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग नलिनी जयवंत यांच्या मृत्यूची धक्कादायक कहाणी; ३ दिवस घरात सडत होता मृतदेह

नलिनी जयवंत यांच्या मृत्यूची धक्कादायक कहाणी; ३ दिवस घरात सडत होता मृतदेह

नलिनी जयवंत यांच्या मृत्यूची धक्कादायक कहाणी समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

हिंदी चित्रपटांवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी मुंबईत झाला. सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी तरुण पिढीत चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि सर्वांच्या मनावर अवघ्या कमी वेळात राज्य केले. त्यावेळचे सुपरस्टार असलेले दिलीप कुमार, अशोक कुमार, देव आनंद यांच्यासोबत काम करण्याची नलिनी जयवंत यांची इच्छा होती. आज त्यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नलिनी जयवंत यांनी शेवटचे काही दिवस एकटेपणात काढले तर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह तीन दिवस घरात सडत असल्याचे समोर आले आहे.

कोण आहे नलिनी जयवंत?

हिंदी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवणारी नलिनी जयंवत, अशी त्यांची ओळख होती. त्यांनी १९४१ मध्ये महबूब खान यांच्या ‘बहन’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली. त्यानंतर अशोक कुमार यांच्यासोबत ‘समाधि’ आणि ‘संग्राम’ हे चित्रपट केल्यानंतर त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘जलपरी’, ‘सलोनी’, ‘काफिला’, ‘नाज’, ‘लकीरें’, ‘नौ बहार’, ‘तूफान में प्यार कहां’, ‘शेरु’ आणि ‘मिस्टर एक्स’ अशा सुपहिट चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली.

मधुबालाचा केला पराभव

- Advertisement -

१९५२ साली मशहूर मॅगजीन ‘फिल्मफेयर’वर नलिनी जयवंत हिचा फोटो झळकला होता. त्यानंतर या अभिनेत्रीचे प्रचंड कौतुक करण्यात आले. या फोटोमुळे मधुबाला यांना देखील मागे टाकत नलिनीने सौंदर्यात प्रथम स्थान पटकावले. सुरुवातीच्या काळात नलिनीला प्रचंड प्रमाणात काम मिळत होते. तसेच तिचे कुटुंब आणि इंडस्ट्री तिच्यासोबत होती. मात्र, शेवटच्या काही दिवसात तिच्यासोबत कोणीच राहिले नाही. त्यामुळे शेवटचे काही दिवस तिने एकटेपणात काढले.

दोनदा अडकली विवाह बंधनात

अभिनेत्री नलिनी जयवंत या दोनदा विवाह बंधनात अडकल्या होत्या. पहिला विवाह त्यांचा चित्रपट दिग्दर्शक विरेंद्र देसाई यांच्यासोबत १९४५ साली झाला होता. मात्र, तीन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह अभिनेते प्रभु द्याल यांच्याशी १९६० रोजी केला. त्यानंतर प्रभु द्याल यांचा २००१ मध्ये मृत्यू झाला.

तीन दिवस मृत्यदेह राहिला घरात

- Advertisement -

मोठ्या पडद्यावर एकामागून एक सुपरहिट चित्रपट गाजवणारी अभिनेत्री नलिनी जयवंत या शेवटच्या वेळी मात्र एकट्या राहिल्या. २० डिसेंबर २०१० रोजी नलिनी यांचा मृत्यू झाला. मात्र, असं म्हटले जात आहे की, त्यांचा तीन दिवस मृत्यू होऊन याबाबत कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांचा मृतदेह तीन दिवस घरातच राहिला.


हेही वाचा – प्रतिक्षा संपली! चित्रपटगृहात प्रदर्शित होणार ‘हे’ मोठे चित्रपट


 

- Advertisement -