घरमनोरंजनप्रियांकाने शेअर केली कांस फेस्टिवलची आठवण

प्रियांकाने शेअर केली कांस फेस्टिवलची आठवण

Subscribe

चमचमणाऱ्या काळ्या आणि लाल सुंदर गाऊनमध्ये प्रियांका दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. प्रियांका सध्या तिचा नवरा निक जोनस सोबत लंडनमध्ये आहे. प्रियांकाच्या नव्या सिनेमाचे शुटींग लंडनमध्ये पार पडले. प्रियांका सध्या लंडमध्ये तिच्या नवऱ्यासोबत क्वालिट टाइम स्पेंड करताना दिसत आहे. प्रियांका आणि निक दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मजेदार फोटो शेअर करत असतात. प्रियांकाने आज तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन कांस फिल्म फेस्टिवलचे फोटो शेअर केले आहेत.

- Advertisement -

२०१९ मध्ये झालेल्या कांस फिल्म फेस्टिवलमधील फोटो प्रियांकाने शेअर केले आहेत. ज्यात प्रियांका रेड कार्पेटर वर चालताना दिसत आहे. चमचमणाऱ्या काळ्या आणि लाल सुंदर गाऊनमध्ये प्रियांका दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. जुन्या आठवणींना उजाळा देताना प्रियांकाने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘मी माझा ड्रेस घालून रेड कार्पेटवर जाण्याआधी माझ्या गाऊनचे झिपर अचानक तुटले. वर वर जे दिसत आहे ते तसे नव्हते. मात्र माझ्या टिमने शेवटच्या क्षणी तुटलेले झिपर लावून दिले. माझ्या टिममुळे मी रेड कार्पेटवर जाऊ शकली’, असे प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

प्रियांका सध्या अनेक कारणांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. प्रियांकाने नुकतेच तिचे अनफिनिश्ड हे पुस्तक लाँच केले. त्याचीही खूप चर्चा करण्यात आली होती. प्रियांकाने कांस फिल्म फेस्टिवलची शेअर केलेली आठवण तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडलेली दिसत आहे.


हेही वाचा – लवकरच श्रद्धा लग्नबंधनात!, वडील शक्ती कपूर यांनी केला ‘हा’ खुलासा

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -