घरताज्या घडामोडीसुशांतच्या मृत्यूचे गुपित मीच सांगणार - राखी सावंत

सुशांतच्या मृत्यूचे गुपित मीच सांगणार – राखी सावंत

Subscribe

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय शो बिग बॉसमधील सदस्य आणि कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंतने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी राखी सावंतने सांगितले की, ‘ती गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीशी सामना करत होती. एवढेच नाही तर तिला दागिने आणि प्रॉपर्टी देखील विकावी लागली.’ पण आता राखी सावंत बिग बॉसच्या घरात जाऊन सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा काही तरी खुलासा करणार असल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेशी बातचित करताना राखी सावंत म्हणाली की, ‘गेल्या तीन-चार वर्षात तिच्या आयुष्यात खूप उलथा-पालथ झाली आहे. याशिवाय तिला धोका आणि फ्रॉडचा देखील सामना करावा लागला आहे. यामुळे ती तिच्या कामावर फोकस करू शकत नव्हती. त्यामुळे तिला छोट्या-मोठ्या गरजेसाठी दागिने आणि प्रोपर्टी विकावी लागली.’

- Advertisement -

पुढे राखी म्हणाली की, ‘मी माझ्या मेहनतीच्या कमाईने स्वप्न पूर्ण केली, ती मी संपताना पाहिली. बिग बॉस घरात मी प्रेक्षकांना स्वतःबद्दल सांगेन. तसेच या शोमध्ये सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे गुपित सांगणार आहे. सध्या मी याबाबत जास्त काही बोलणार नाही.’

यापूर्वी राखी सावंतने सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुशांत तिच्या स्वप्नात आल्याचा दावा केला होता आणि म्हणाला होती की, ‘राखी मी तुझ्या पोटी जन्माला येईन.’ दरम्यान राखी जेव्हा लखनऊमध्ये एका वेबसीरिजचे शूटिंग करत होती, तेव्हा तिला बिग बॉस शोची ऑफर आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

- Advertisement -


हेही वाचा – पाण्यावरून सपना चौधरीची सासरच्यांशी भांडणं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -