Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन राखी सावंतला व्हायचंय आई!...पण बाळाचा बाप पाहिजे

राखी सावंतला व्हायचंय आई!…पण बाळाचा बाप पाहिजे

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावरबॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बिग बॉस १४ च्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेत्री राखी सावंत १४ लाख रुपये जिंकून शर्यतीतून बाहेर पडली. बिग बॉसमध्ये बर्‍याच दिवसांनंतर राखीला ओरिजनल एंटरटेनर म्हणून घोषित करण्यात आले होते. राखी तिच्या विचित्र कारनाम्यांमुळे तसेच कृत्यांमुळे तिने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर राखी पहिल्यांदाच माध्यमांशी बोलली. यावेळी राखी म्हणाली, माझ्या जीवनाची प्राथमिकता आई बनणे असून आता मला आई व्हायचंय…

असं म्हणाली राखी सावंत…

आपल्या जीवनात जे काम करायचं आहे, त्यापैकी सर्वात पहिलं काम मला आई व्हायचंय. तर “आता माझी प्राथमिकता आई होणे आणि मातृत्व अनुभवणे आहे. मला माझ्या बाळासाठी विकी डोनरची गरज नाही, तर मला बाळाच्या बापाची गरज आहे. मला सिंगल मदर व्हायचे नाही. हे कसे होईल हे मला माहित नाही, पण मला खरोखरच हे करायचे आहे. मला आशा आहे की यावर नक्कीच पर्याय निघेल”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

- Advertisement -

बिग बॉस सीझन १४ बद्दल सांगायचे झाले तर रुबीनाने अर्थातच ट्रॉफी जिंकली असली तरी पण राखी सावंतने बिग बॉसच्या घरात राहून आपल्या करमणुकीच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यावेळी अभिनेत्रीनेही कबूल केले की आपण पैशासाठी घरात प्रवेश केला होता आणि पाच अंतिम स्पर्धकांना जेव्हा १४लाख रुपयांची ऑफर दिली गेली तेव्हा तिने त्वरित बॅग घेतली आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.

- Advertisement -

 

- Advertisement -