Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार

Subscribe

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी एकूण 106 नावांची घोषणा करण्यात आली ज्यांना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री देण्यात येणार आहेत. 90 च्या दशकातील चित्रपट गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला देखील पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

रवीना टंडनने मानले केंद्र सरकारचे आभार

- Advertisement -

पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर रवीना टंडन तिच्या भावना व्यक्त करत म्हणाली की, “मी सन्मानित आणि कृतज्ञ आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही. माझे योगदान, माझे आयुष्य, माझी आवड आणि उद्देश ज्याने मला केवळ बॉलिवूडच नव्हे, तर त्यापलीकडेही योगदान दिले, त्याची दखल घेतल्याबद्दल भारत सरकारचे धन्यवाद. या प्रवासात ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे मी आभार मानते. यासाठी मी माझे वडील रवी टंडन यांची देखील ऋणी आहे.”

वयाच्या 17 व्या वर्षी रवीनाने केली होती करिअरला सुरुवात
अभिनेत्री रवीना टंडनने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. रवीन टंडनचे चित्रपटसृष्टीत योगदान पाहून केंद्र सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आली आहे.

- Advertisement -

‘नातू नातू’च्या संगीतकार एमएम कीरावानी यांना देखील मिळणार पद्मश्री

Padma Awards 2023 | 'RRR' fame composer MM Keeravaani honoured with Padma  Shri2022 मधील लोकप्रिय ठरलेल्य़ा ब्लॉकबस्टर ‘RRR’ चित्रपटामधील ‘नातू नातू’ गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी यांना देखील पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच तबलावादक झाकीर हुसेन आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 


हेही वाचा :

चित्रपट पाहायच्या आधीच लोक… एआर रहमान यांनी केली ‘गांधी गोडसे : एक युद्ध’च्या दिग्दर्शकाची पाठराखण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -