रवीना टंडनची पहिली वेबसीरिज ‘Aranyak’चा प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

bollywood actress raveena tandon debut web series aranyak release date confirmed by netflix
रवीना टंडनची पहिली वेबसीरिज 'Aranyak'चा प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन नेटफ्लिक्सवरील वेबसीरिज ‘अरण्यक’मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. या बहुप्रतिक्षित सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. नेटफ्लिक्सने मंगळवारी टीझरसोबत सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारीखची घोषणा केली. या मिस्ट्री-थ्रिलर सीरिजमध्ये रवीना एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
(bollywood actress raveena tandon debut web series aranyak release date confirmed by netflix)

सध्या ‘अरण्यक’चा ५७ मिनिटांचा टीझर चांगलाच चर्चेत आला आहे. या टीझरमध्ये रवीना टंडनसोबत आशुतोष राणा, परमब्रत चटर्जी, जाकिर हुसेन, मेघना मलिक दिसत आहेत. या टीझरमधून वेबसीरिजमध्ये काय दाखवण्यात आले आहे? याचा अंदाज लावला जाऊ शकतो. रवीना टंडनची ही पहिली वहिली वेबसीरिज १० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेटफ्लिक्सने टीझर शेअर करत लिहिले की, ‘जसे दिसते, तसेच होते असे नाही. तुमचे डोळे उघडे ठेवा आणि डोळे मिचकवू नका. अंधारात काहीतरी आहे, जे पाहत आहे. ‘अरण्यक’ नेटफ्लिक्सवर १० डिसेंबरला येत आहे.’

‘अरण्यक’ या वेसबीरिजचे दिग्दर्शन रोहन सिप्पीने केले असून रमेश सिप्पी आणि सिद्धार्थ रॉय सीरिजचे निर्माते आहेत. या वेबसीरिज व्यतिरिक्त रवीनाचा आगामी चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रवीना टंडन एक वेगळा अवतारात दिसणार आहे. रविना टंडन ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्या काळात ‘मोहरा’, ‘अंदाज अपना अपना’, ‘लाडला’, ‘दुल्हे राजा’, ‘आक्स’, ‘दामन’, ‘सत्ता’ अशा अनेक जबरदस्त चित्रपटात तिने काम केले. त्यानंतर आता बऱ्याच काळानंतर वेबसीरिजच्या माध्यमातून रवीना प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


हेही वाचा – गिरीश कुलकर्णी, ओम भूतकर ‘रावरंभा’ चित्रपटात दिसणार एकत्र