Ghum Hai Kisikey Pyaar Mein: छोट्या पडद्यावर रेखाची एंट्री, प्रेक्षकांना घालणार भुरळ

rekha ready make her acting comeback television debut ghum hai kisikey pyaar mein watch promo
Ghum Hai Kisikey Pyaar Mein: छोट्या पडद्यावर रेखाची एंट्री होणार, प्रेक्षकांना घालणार भुरळ

बॉलिवूडच्या सुपरहिट अभिनेत्रींमध्ये आजही रेखाचे नाव आवर्जून घेतले जाते. रेखा (Rekha Fashion) यांच्या मोहक सौंदर्याचे आणि अनोख्या स्टाइलचे आजही लाखो चाहते आहेत. हटके पारंपारिक स्टाइल स्टेटमेंटमुळे रेखा नेहमीच चर्चेत असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. गेली अनेक वर्षे रेखा भलेही सिनेमांमध्ये दिसल्या नाहीत, तरी चाहत्यांवरील रेखा यांची जादू कमी झालेली आहे. चाहत्यांकडून त्यांच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने पाहिली जाते. अशातचं रेखा यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण रेखा लवकरचं छोट्या पडद्यावर एंट्री घेणार आहेत. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांपाठोपाठ आता रेखाही प्रेक्षकांवर भुरळ घालण्यास सज्ज झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसीके प्यार में’ सध्या जोरदार चर्चेत आहे. या मालिकेतूनचं रेखा यांची एंट्री होणार आहे. नुकताचं स्टार प्लस चॅनलने या मालिकेतील रेखा यांचा एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये रेखा आपल्या दिलखेचक अंदाजात ‘गुम है किसीके प्यार मे’ गाणे गाताना दिसतायंत. या व्हिडियोत रेखा नेहमीप्रमाणेच मनमोहक दिसतायंत. या प्रोमोनंतर चाहत्यांना रेखा यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता लागून आहे. मात्र बऱ्याच दिवसांनी रेखा स्क्रीनवर दिसल्याने चाहत्यांना आनंद होत आहे.

सध्या या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येत आहे. यात विराट आणि सई यांच्यातील हनीमून ट्रॅक लवकरच दाखवला जात आहे. मात्र या मालिकेत रेखा पहिल्यांदाच दिसणार नाहीत. याआधी रेखा या मालिकेच्या सुरुवातीच्या प्रोमोमध्ये दिसल्या होत्या. मात्र पून्हा या मालिकेतील रेखा यांचे दर्शन प्रेक्षकांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. ‘गुम है किसीके प्यार में’ ही मालिका विराट (नील भट्ट), सई (आयशा सिंह) आणि पत्रलेखा उर्फ ​​पाखी (ऐश्वर्या शर्मा) यांच्या लव्ह ट्रॅगलवर आधारित आहे. ज्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.