घरताज्या घडामोडीVideo: साराने सोडली Acting करायला लागली Reporting!

Video: साराने सोडली Acting करायला लागली Reporting!

Subscribe

अभिनेत्री सारा अली खानचा हा रिपोर्टिंग करतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये सारा जबरदस्त रिपोर्टिंग करताना दिसत आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सध्या सारा अली खान बनारसमध्ये चित्रपटाची शूटिंग करत आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा प्रसिद्ध विश्वनाथ मंदिर येथून रिपोर्टिंग करताना दिसत आहे. यामध्ये सारा मंदिर परिसरातील गल्लीमध्ये फिरताना दिसत आहे. त्याच बरोबर ती आपल्या चाहत्यांना तिथल्या लोकप्रिय वस्तू दाखवताना दिसत आहे. रिपोर्टिंग करतानाचा हा व्हिडिओ साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

- Advertisement -

या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री सारा अली खानने कपालावर टिका लावला असून गळ्यात फुलांची माळ घातलेली दिसत आहे. सारा अली खानने हा व्हिडिओ शेअर करताना असं लिहिलं की, ‘नमस्कार प्रेक्षक, बनारसच्या गल्ली मधून…खूप भारी दिवस. खूप कमी पैशात जास्त मस्ती करू शकता. पण तुम्ही बनारसमध्ये राहत असला तर…’

- Advertisement -

साराच्या या व्हिडिओला चाहते खूप प्रतिसाद देत आहेत. अलीकडेच ‘लव आजकल’ चित्रपटामधून सारा अली खान प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात सारासोबत बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत होता.
व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने सारा आणि कार्तिकचा ‘लव आजकल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काहीस यश मिळालं नाही. या व्यतिरिक्त सारा अली खान लवकरच ‘कुली नंबर वन’ आणि ‘अतरंगी रे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – जेम्स बॉण्डची हिरोईन ओल्गा कुरिलेंकोला करोना पॉझिटीव्ह!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -