घरताज्या घडामोडीतनुश्री दत्ताच्या वकिलाविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल

तनुश्री दत्ताच्या वकिलाविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या वकिला विरोधात ३ जानेवारीला मुंबईत पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. वांद्र येथे तनुश्री दत्ताच्या वकिलांवर महिलेशी बोलताना अपशब्द वापरल्याचा आणि छेडछाड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सर्व माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे वकील नितीन सातपुते हे नाना पाटेकर विरोधात तनुश्री दत्ताचे वकील आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेर झालेल्या घटनेत सातपुते यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप ४७ वर्षीय पीडियत महिलेने केला आहे. खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना पीडित महिलेने सांगितलं की, २ नोव्हेंबर रोजी मुलांसाठी बाग बांधण्याबाबत नितिन सातपुते यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतर सातपुते यांनी पीडित महिलेला मोबाईलवरून फोन केला आणि तिच्यासोबत चुकीच्या भाषेत संवाद साधला. मग यानंतर पीडित महिलेने ४ नोव्हेंबरला राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली.

- Advertisement -

सोमवारी राज्य महिला आयोगामध्ये पीडितेला बोलावलं होतं. त्यावेळेस ती जेव्हा कार्यातून बाहेर पडली तेव्हा सातपुतेने तिच्या जवळ जाऊन तिला अपमानजनक शब्दांचा वापर केला. गुरुवारी पोलिसांनी कलम ३५४ ए आणि भारतीय दंड संहितेच्या इतर तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं गेलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटकर यांच्यावर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तनुश्रीची छेडछाड केल्याचा आरोप तिने केला होता. त्यानंतर भारतात मी टू मोहिमेला सुरुवात झाली. मात्र तनुश्री दत्ताचे आरोप नाना पाटेकर यांनी फेटाळून लावलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. यानंतर देशातील अनेक महिलांनी मी टू मोहिमेच्या मार्फत चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची नावं समोर आली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मलंग’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; दिशाच्या लूकवर चाहते फिदा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -