अभिनेत्री यामी गौतमला अंमलबजावणी संचालनालय (ED)ने समन्स बजावला आहे. फेमा (FEMA – फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट) उल्लंघन केल्याप्रकरणी यामीची चौकशी केली जाणार आहे. ईडीने दुसऱ्यांदा यामी गौतमला समन्स बजावला आहे. गेल्यावर्षी पहिला समन्स बजावला होता. त्यावेळी यामी लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे ईडीच्या ऑफिसला पोहोचली नव्हती. यावेळी यामीला ७ जुलैपर्यंत ईडी ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे.
Mumbai: Enforcement Directorate (ED) summons actor Yami Gautam, asking her to appear before them next week to record her statement in connection with alleged irregularities under FEMA (Foreign Exchange Management Act).
(File photo) pic.twitter.com/orR0zzk2nn
— ANI (@ANI) July 2, 2021
गेल्या वर्षभरातपासून ईडीची यामीवर नजर आहे. काही वृत्तानुसार, यामीच्या खात्यातून परकीय चलन व्यवहारात झालेल्या अनियमिततेच्या तपास सुरू आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणात अनेक मोठे बॅनर ईडीच्या निशान्यावर आहेत. गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकरांची ईडीने चौकशी केली आहे.
View this post on Instagram
अलीकडे यामी गौतम ‘उरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य थरसोबत लग्नबंधनात अडकली. काही दिवसांपूर्वीच यामी गौतम आपल्या पतीसोबत मुंबईला परतली होती. तिच्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच खूप व्हायरल झाला होता.
View this post on Instagram
यामीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती ३ चित्रपट ‘भूत पुलिस’, ‘दसवी’, ‘अ थर्सडे’ यामध्ये दिसणार आहे. ‘भूत पुलिस’मध्ये यामी गौतमसोबत अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि जॅकलीन फर्नांडिस प्रमुख भूमिकेत आहेत. ‘दसवी’मध्ये यामीसोबत अभिषेक बच्चन आणि निरमत कौर दिसणार आहेत. या चित्रपटात यामी आयपीएस ऑफिसराच्या व्यक्तिरेखेत आहे. तर ‘अ थर्सडे’ चित्रपटात यामी एका शिक्षिकेची भूमिकेत असणार आहे. ‘अ थर्सडे’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे.
हेही वाचा – राखीला हवाय स्टार किड्सच्या आईचा रोल