करवा चौथ साजरा करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्रींची अनिल कपूरच्या घरी हजेरी

बॉलिवूड कलाकार प्रत्येक सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात. नुकत्याच काही हे दिवसांपूर्वी कलाकार त्यांच्या घरी गणेश चतुर्थी आणि त्यानंतर नवरात्री धूमधडाक्यात साजरी करताना दिसले. आता त्यानंतर 13 रोजी झालेला करवा चौथ देखील या बॉलिवूड अभिनेत्रींनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अनिल कपूरच्या घरी पोहोचल्या शिल्पा आणि रवीना

प्रत्येक वर्षीप्रमाणे अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूरने करवा चौथच्या निमित्ताने घर भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या क्षणी रवीना टंडन, शिल्पा शेट्टीसोबतच इतर विवाहीत बॉलिवूड अभिनेत्री पोहोचल्या होत्या. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच यादरम्यानचे अनेक व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल होत आहेत.

 रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टीने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

अनिल कपूर यांच्या घरी या अभिनेत्रींची हजेरी

अनिल कपूर यांच्या घरी रवीना टंडन, शिल्पा शेट्टी यांच्यासोबतच वरुण धवनची पत्नी नताषा दलाल, महीप कपूर, फराह खान, नीलम यांच्यासोबत अनेकजणी होत्या.

 


हेही वाचा :

अल्लू अर्जुनने पटकावला ‘इंडियन ऑफ द ईयर’ पुरस्कार