घरमनोरंजनआलियानंतर कतरिनाकडून आता 'गुड न्यूज', लग्नानंतर...

आलियानंतर कतरिनाकडून आता ‘गुड न्यूज’, लग्नानंतर…

Subscribe

बॉलिवूडसाठी 2022 हे वर्षे खूप खास आहे. या वर्षात बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते लग्नबंधनात अडकले, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर अनेक स्टार्सनी लग्न केले. यात मौनी रॉय- सूरज नांबियार, करिश्मा- वरूण बंगिरा आणि मोस्ट अवेटेड कपल आलिया भट्ट – रणबीर कपूरचे या कपल्सचे नाव घेतले जाते. दरम्यान बॉलिवूडमधील या लग्नाच्या चर्चा थांबत नाही तोवर आता गुड न्यूजच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, नुकतंच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आपण आई-बाबा होणार अशी गुडन्यूज दिली. या गुडन्यूजनंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहेत.

आलियाने आता आई होणार असल्याची बातमी देताच कतरिनाने देखील आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिनाने ही गुडन्यूज दिली आहे. त्यामुळे चाहते देखील उत्साहित झाले आहेत. मात्र ही गुड न्यूज आई होण्याची नाही तर एका चित्रपटाची आहे, मात्र ही गोड बातमी आई होण्याची नसली तर चाहते फार आनंदात आहेत. कारण कतरिनाने लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

फोन भूत असे या चित्रपटाचे नाव असून तो लवकरचम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कतरिना कैफने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या आगामी फोन भूत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे, ‘फोन भूतच्या जगात तुमचं स्वागत आहे,’ असं कॅप्शन अभिनेत्रीने चित्रपटाचे टिझर शेअर केलं आहे. कतरिनाचा हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.

कतरिनाने चित्रपटाचा २२ सेकंदाचा टिझर शेअर केला आहे. मात्र या टीझरवरून चित्रपटाच्या स्टोरीचा अंदाज बांधणे अवघड आहे. कतरिना तिच्या चाहत्यांना घाबरवण्यासाठी भूत बनून येत असल्याच या टिझरवरुन समोर येत आहे. यामुळे कतरिना स्त्री भूताच्या भूमिकेत दिसणार असल्याचा अंदाज चाहत्यांकडून बांधला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

- Advertisement -


या चित्रपटात कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटातील कतरिनाच्या लूकला युजर्स पसंती देत आहेत. त्यामुळे कतरिनाच्या या आगामी चित्रपटाबद्दल चाहते उत्सुक आहेत. यातच अनेकांनी कतरिनाला आई होण्याची गुडन्यूज देण्याची मागणी देखील केली आहे.


‘शेरशाह’ नंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी झळकणार ‘या’ सिनेमात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -