घरताज्या घडामोडीVideo: घटस्फोट घेतल्यानंतर आमिर, किरणचा 'हा' व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांना म्हणाले...

Video: घटस्फोट घेतल्यानंतर आमिर, किरणचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांना म्हणाले…

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दोघांनी शनिवारी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. लग्नाच्या १५ वर्षांनंतर आमिर आणि किरण वेगळे झाले आहेत. या बातमीनंतर चाहत्यांना एक वेगळाच धक्का बसला. पण जरी दोघे वेगळे होत असेल तरी मुलगा आजादला एकत्र मिळून सांभाळणार आहेत. दरम्यान घटस्फोट जाहीर केल्यानंतर आमिर आणि किरणच्या एका मुलाखतीची एक क्लिक सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

घटस्फोट जाहीर केल्यानंतर आमिर आणि किरणने ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीसाठी आमिर आणि किरण एकत्र बसले आहेत. यात आमिर खान चाहत्यांना म्हणाला की, ‘तुम्हाला खूप दुःख झाले असेल. शॉक लागला असेल. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही दोघं खूप आनंदी आहोत. आम्ही एकच कुटुंब आहोत. आमच्या नात्यात बदल आला आहे. परंतु आम्ही दोघं एकमेकांसोबत आहोत. तर तुम्ही असा कधीच विचार करू नका आणि पाणी फाऊंडेशन आम्हाला आजादप्रमाणे आहे. जसा आमचा आजाद मुलगा आहे, त्याप्रमाणे पाणी फाऊंडेशन आहे. आम्ही नेहमी कुटुंबच राहणार आहोत. तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा की, आम्ही आनंदी राहू. फक्त एवढंच बोलू इच्छितो.’

- Advertisement -

आमिर आणि किरणने घटस्फोटाचे जाहीर करताना सांगितले की, ‘आम्ही छान १५ वर्षांमध्ये एकत्र आयुष्यभरातील अनुभव आणि आनंद शेअर केला आहे. आमचे नाते विश्वास,सन्मान आणि प्रेमावर आधारित होते. आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे. आम्ही नवरा बायको म्हणून नाही तर चांगले आई वडील म्हणून राहणार आहोत. आम्ही एकमेकांपासून वेगळे होत असलो तरी पाणी फाऊंडेशन किंवा सिनेमांचे काम एकत्रित करणार आहोत. आम्ही परस्पर संमतीने हा घटस्फोट घेत आहोत.’

- Advertisement -

हेही वाचा – रिलीज न झालेला इरफान खानचा ‘दुबई रिटर्न’ चाहत्यांच्या भेटीला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -