घरमनोरंजनBellBottom: 'मरजावां' या पहिल्या गाण्यात अक्षय कुमारसह वाणी कपूर दिसले Romantic अंदाजात

BellBottom: ‘मरजावां’ या पहिल्या गाण्यात अक्षय कुमारसह वाणी कपूर दिसले Romantic अंदाजात

Subscribe

अक्षय कुमारच्या बेलबॉटम या चित्रपटाचे आज पहिले गाणे मरजावां रिलीज झाले आहे. मरजावान हे अक्षय कुमार आणि वाणी कपूर यांच्यावर चित्रित केलेले एक रोमँटिक गाणे आहे. या गाण्यात दोघेही Romantic अंदाजात दिसत असून मरजावांमधील अक्षय आणि वाणीच्या प्रेमकथेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसतेय. १९ऑगस्ट रोजी बेलबॉटम चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासह त्याने असेही लिहिले, बेलबॉटम मधील माझे आवडते गाणे, मरजावाँ में आ गया है. हे गाणे गुरनझर सिंह यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले असून गौरव देव आणि कार्तिक देव यांचे संगीत आहे. गुरनझर आणि आशिष कौर यांनी ते गायले आहे.

- Advertisement -

बेलबॉटम हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असून त्याची कथा १९८४ मधली असल्याचे सांगितले जात आहे. हा ८० च्या दशकातील प्लेन हायजॅक झालेल्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेतील सिक्रेट एंजटचा रोल साकारणार आहे. विमान अपहरणाच्या घटनेभोवती चित्रपटाटी कथा फिरते. अक्षयने बेलबॉटम या चित्रपटात एका गुप्त एजंटची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजीत एम तिवारी यांनी केले आहे. वाणी कपूर अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. लारा दत्ता या चित्रपटात माजी पंतप्रधान लारा दत्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर हुमा कुरेशी अक्षयला त्याच्या मिशनमध्ये साथ देताना दिसणार आहे.

बेल बॉटम या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३ डी थिएटटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. अक्षय कुमार,लारा दत्त, हुमा कुरेशी,वाणी कपूर आणि जैकी भगनानी यासारखी तगडी स्टॉरकास्ट चित्रपटात पाहता येणार आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -