Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बिग-बींची बॉलिवूडमध्ये Half-Century; शेअर केला थ्रो बॅक फोटो, म्हणाले...

बिग-बींची बॉलिवूडमध्ये Half-Century; शेअर केला थ्रो बॅक फोटो, म्हणाले…

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड विश्वातील महानायक, बिगबी अर्थात अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला एक चेहरा. अभिनयातील कारकीर्दीत त्याचे नावलौकिक आहेच यासह सर्व चाहत्यांना त्यांच्या करिअरच्या स्ट्रगलविषयी देखील माहिती आहे. अमिताभ बच्चन यांचा अभिनय क्षेत्रातील अविस्मरणीय प्रवास हा आजपासूनच सुरू झाला होता. आजच्या दिवशी बिग बी यांना बॉलिवूडमध्ये अर्धशतक म्हणजेच ५० हून अधिक वर्ष पूर्ण झाले आहेत. याच विशेष दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांना त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक जुना थ्रो बॅक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत ५२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल एका चाहत्याने त्यांचे अभिनंदन केले आणि बच्चन यांचे जुने आणि नवीन फोटो शेअर करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अमिताभ बच्चन यांनीही चाहत्यांच्या ट्विटवर रिट्वीट करत १५ फेब्रुवारी १९६९ ५२ वर्ष, धन्यवाद … असा रिप्लाय दिला आहे. हेच ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या अमिताभ बच्चन यांच्या थ्रो बॅक फोटोंची नेटकऱ्य़ांमध्ये चर्चेचा विषय आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या असा शुभेच्छा

- Advertisement -

- Advertisement -