घरमनोरंजन'आशिकी' फेम अनु अग्रवालसाठी स्टारडम ठरले अडचण, अभिनेत्रीची हालत पाहून बिग बी...

‘आशिकी’ फेम अनु अग्रवालसाठी स्टारडम ठरले अडचण, अभिनेत्रीची हालत पाहून बिग बी देखील झाले हैराण

Subscribe

मुंबई – स्टारडम अडचणीचे ठरल्याचे ‘आशिकी’ फेम अभिनेत्री अनु अग्रवालने एका मुलाखतीत सांगितले. स्टारडमनंतर एकटे राहणे खूप भारी पडते. ‘आशिकी’ चित्रपटाच्या यशानंतर मिळालेले स्टारडम हे या अभिनेत्रीसाठी अडचण बनली होती. चित्रपट चांगला चालल्याने या अभिनेत्रीचा पाठलाग होत होता. चाहते वेळकाळ न पाहता त्रास देत असत. अश्लील मेल्स आणि रात्री – अपरात्री फोन करणे, अशा अनेक पद्धतींनी त्रास दिला जात असे, असे ती सांगते. हे सर्व पाहून बिग बी अमिताभ बच्चनही हैराण झाले होते.

महेश भट आणि मोहित सूरी दिग्दर्शिक आशिकी हा चित्रपट 1990 मध्ये सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटामुळे अभिनेत्री अनु अग्रवाल ही रातोरात स्टार बनली. मात्र हे स्टारडम या अभिनेत्रासाठी एक अडचण बनली होते. चाहत्यांच्या वागण्यामुळे ती अगदी नैराश्यात गेली होती. अनु अग्रवाल हीने एका मुलाखतीत सांगितलं की, अवघ्या 20 वर्षाची असताना अनुचा हा चित्रपट यशस्वी ठरला त्यामुळे ती रातोरात स्टार बनली. त्यावेळी अनु मुंबईमध्ये एकटी राहत होती. चित्रपट सुपरहिट झाल्याने या अभिनेत्रीला बाहेर पडणे मुश्किल झाले होते. एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत तिने या आठवणी सांगितल्या.

- Advertisement -

“घरामध्ये मला एकटे वाटायचे. आपण तुरुंगात आहोत, असं मला नेहमी वाटायचं. त्यावेळी सगळीकडे आशिकी या चित्रपटाची चर्चा असल्याने मी हॅाटेलमध्येही जाऊ शकत नव्हते. माझ्याच चित्रपटाचे गाणं तिथे वाजवायचे. हॅाटेलमध्ये वेटर माझ्याच टेबलजवळ येऊन उभा राहायचा. हॅाटेलमधील सर्व लोक जेवण सोडून पाहत बसायचे त्यामुळे अवघडल्यासारखे होऊन मी सुद्धा नीट जेवण करु शकत नव्हते”

अभिनेत्रीची हालत पाहून अमिताभ बच्चनही झाले हैराण

- Advertisement -

अनु अग्रवाल हिला स्टारडमनंतर मुंबईमध्ये एकटीला रहावं लागायचं, त्यावेळी अमिताभ बच्चनही हैरान झाले होते. स्टारडमनंतर अनु अग्रवालचा लोक पाठलाग करत आणि रात्री अपरात्री फोन करत होते. एका मुलाखतीत अनु अग्रवाल हिने सांगितलं की, “लोक माझा पाठलाग करायचे तेव्हा खूप भीती वाटायची. मी ज्या इमारतीत राहायची त्या इमारतीमध्ये एक राजकीय नेत्याचा मजबूत स्टाफ देखील होता. इमारतीच्या आजूबाजूला तगडा पोलीस बंदोबस्त होता. या सगळ्याला कंटाळून मी एकटीनेच राहायला सुरुवात केली. “अमिताभ बच्चन यांनी मला घर सोडण्याबाबत विचारलं, ‘तू एकटीच राहतेस का? असं विचारल्यावर मी त्यांना मला आलेले अनुभव सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -