भूमी पेडणेकरच्या बहुचर्चित ‘द लेडी किलर’ ची घोषणा, अर्जुन कपूरसोबत करणार स्क्रीन शेअर

bollywood bhumi pednekar will be lead actress of the lady killer with arjun kapoor
भूमी पेडणेकरच्या बहुचर्चित 'द लेडी किलर' ची घोषणा, अर्जुन कपूरसोबत करणार स्क्रीन शेअर

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या नव्या चित्रपटाची अखेर घोषणा झाली आहे. ‘द लेडी किलर’ असे तिच्या बहुचर्चित चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. भूमी पहिल्यांदाच अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘द लेडी किलर’ हा एक सस्पेन्स ड्रामा चित्रपट असून ज्यामध्ये प्रेक्षकांना एका छोट्या शहरातील प्लेबॉयची कथा पहायला मिळेल.

या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि शैलेश आर सिंग करणार आहेत. तर अजय बहल दिग्दर्शित हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज कर्मा मीडिया आणि एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शित होणार आहे. छोट्या शहरातील प्लेबॉयच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या या कथेत प्रेक्षकांना उत्कंठावर्धक ट्विस्ट, नर्व्ह-रॅकिंग सस्पेन्स अशा अनेक मिश्रणांचा एक मनोरंजनाचा पॅकेज पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by tseriesfilms (@tseriesfilms)

अभिनेत्री भूमी पेडणेकर या चित्रपटाविषयी खूप उत्सुक आहेत. यावर तिने सांगितले की, मी नेहमीच नवीन आणि आव्हानात्मक गोष्टी करण्यास उत्सुक असते आणि ‘द लेडी किलर’ने मला सुरुवातीपासूनच आकर्षित केले आहे. या चित्रपटामुळे एक कलाकार म्हणून कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली.

द लेडी किलर चित्रपटाव्यतिरिक्त भूमी पेडणेकर अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ आणि ‘बधाई हो’ सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यापूर्वी अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.


arjun kapoor, malaika : अर्जुन आणि मलायकाचे ब्रेकअप! अभिनेत्रीने स्वत:ला घेतले कोंडून