करण सिंग ग्रोवरच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, बिपाशा बासूचा मोठा खुलासा

बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे 2015 मध्ये 'अलोन' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर दिसला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले.

bollywood bipasha basu talk about her marriage with karan singh grover reveal her parents had objected to it
करण सिंग ग्रोवरच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, बिपाशा बासूचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र पती अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत ती आपली लव्ह लाइफ एन्जॉय करताना दिसतेय. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर यांनी 2016 मध्ये लग्न केले. मात्र करण सिंग ग्रोव्हरचे हे तिसरे लग्न आहे. तर बिपाशा बसूचे हे पहिले लग्न आहे. अशा परिस्थितीत करण सिंग ग्रोवरसोबतच्या लग्नासंदर्भात बिपाशाने मोठा खुलासा केला आहे. “करणसोबत लग्न करण्यासाठी बिपाशाला तिच्या कुटुंबियांना पटवणे खूप कठीण जात होते,” असं ती म्हणाली आहे.

याबाबत अधिक खुलासा करत बिपाशा बसूने आपल्या फिल्मी करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरेच काही सांगितले आहे. बिपाशा बसूने सांगितले की, “करणची दोन्ही लग्नं तुटल्यामुळे बिपाशाला तिच्या घरच्यांना समजवणे खूप कठीण गेले. त्यामुळे तिचे कुटुंबिय या लग्नाला विरोध करत होते.”

यावर बिपाशा बसू पुढे म्हणाली, “एखाद्याचे लग्न तुटणे याचा अर्थ असा नाही की, ती व्यक्ती चुकीची असेल. त्यामुळे त्या व्यक्तीची निंदा करणे चुकीचे आहे. माझ्यासाठी, मी माझ्या पालकांना समजावून सांगितले की, माझ्यासाठी हे नाते लग्नापेक्षाही खूप मोठे आहे. मी कागदावर सही केली नाही एवढेच. मग तो मला त्याच्यापेक्षा वेगळा कसा बनवतो.”

बिपाशा बसूने सांगितले की, “जेव्हा नातेसंबंध संपुष्टात येतात तेव्हा हृदय आतून तुटते, परंतु कालांतराने गोष्टी चांगल्या होतात. नाते अधिक काळ टिकत नाही हे दुर्दैवी आहे. परंतु जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्ही नेहमी आनंदी असता. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी कारणास्तव घडतात असे नेहमी म्हटले जाते आणि ते नेहमीच खरे असते.”

बिपाशा बसूने तिच्या आयुष्याबद्दल खूप काही गोष्टी शेअर केल्या आहेत. बिपाशाने 2001 मध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अजनबी’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले होते. याशिवाय बिपाशा बसूने राज, रक्त, फूटपाथ, ऐतबारसह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे 2015 मध्ये ‘अलोन’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर दिसला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले.


IPL 2022 : सुहाना खान पहिल्यांदा IPL Auctionc मध्ये, तर शाहरुख ऐवजी आर्यन खानची हजेरी