रणबीर- आलियाच्या बहुचर्चित ‘Brahmastra’ चा Trailer ‘या’ दिवशी होणार रिलीज

Bollywood Ranbir Kapoor & Alia Bhatts Brahmastra Trailer To Be Released On June 15
रणबीर- आलियाच्या बहुचर्चित 'Brahmastra'चा Trailer 'या' दिवशी होणार रिलीज

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा मोस्ट अवेटेड ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत, आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनला देखील सुरुवात केली. दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेता रणबीर सिंह विशाखापट्टणमला पोहोचले आहेत. (Brahmasatra Trailer Release Date)

आता विशाखापट्टणमने एका कार्यक्रमादरम्यान ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर झाली आहे. आलिया आणि रणबीर कपूर अभिनीत या चित्रपटाचा ट्रेलर 15 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जीने एक टीझर व्हिडिओ शेअर करून ब्रह्मास्त्रच्या ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. (Brahmastra Trailer Release On 15 June)

या टीझरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन यांचीही झलक पाहायला मिळतेय. तर मौनी रॉय अतिशय क्रूर अंदाजात दिसतेय. या टीझरमध्ये मौनी रॉय (Mouni Roy) आणि रणबीर कपूर यांच्यात जबरदस्त वॉर पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

दरम्यान विशाखापट्टणममधील रणबीर कपूरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये अभिनेता एसएस राजामौली आणि अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यांच्यासोबत विशाखापट्टणम विमानतळावरून बाहेर पडताना दिसतायत, यावेळी चाहते त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात. पण काही सेकंदातच उपस्थित एक चाहता रणबीर कपूरला गुलाबाचे फूल देण्यासाठी गर्दीच्या पुढे जातो, तेव्हा सुरक्षा कर्मचारी त्या चाहत्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण अभिनेत्याने त्या चाहत्याकडून फुलं घेत अभिवादन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

अयान मुखर्जी दिग्दर्शित या सुपरनॅचरल साय-फाय चित्रपटात रणबीर कपूर सुपर पॉवर शिवाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर आलिया भट्ट ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे. ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट 09 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


हृता दुर्गुळेचा ‘अनन्या’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला