आपल्या लाडक्या बॉलिवूड कलाकारांच्या टॅटू मागचा नेमका अर्थ काय? वाचा

bollywood celebrity tattoos meaning
आपल्या लाडक्या बॉलिवूड कलाकारांच्या टॅटू मागचा नेमका अर्थ काय? वाचा

प्रत्येकाला आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असते. त्यांच्या आवडी निवडी नेमक्या काय आहेत? हे पाहायला खूप आवडत. काही कलाकारांनी शरीरावर अनेक प्रकारचे हटके टॅटू काढले आहेत. कलाकारांच्या आवडी निवडीसोबत त्यांच्या शरीरावर काढलेल्या टॅटू मागचा नेमका अर्थ काय असेल? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्यामध्ये असते. त्यामुळे आज आपण काही बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांनी काढलेल्या टॅटू मागचा नेमका अर्थ काय आहे? हे जाणून घेऊयात.

प्रियांका चोप्राचा मनगटावरील टॅटू 

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी मनगटावर टॅटू काढला आहे. डॅडिज् लिटील गर्ल असे लिहिलेला टॅटू प्रियांकाचा आहे. तिने हा टॅटू खास वडिलांसाठी काढला असून तिच्या वडिलांच्या अक्षराच्या वळणाप्रमाणे तो काढला आहे.

अक्षय कुमारने पाठीसह ‘या’ ठिकाणी काढले टॅटू 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमाराचा टॅटू आपल्या कुटुंबाप्रती प्रेम दर्शविणारा आहे. अक्षय कुमाराच्या पाठीवर मुलगा आरव याच्या नावाचा टॅटू असून त्याच्या खांद्यावर बायको ट्विकलचे टोपण नाव टीना आणि मुलगी निताराच्या नावाचा टॅटू आहे.

हृतिक रोशनचा मनगटावरील टॅटू 

आपल्या डान्स स्टाईलने सगळ्यांना घायाळ करणारा हृतिक रोशनने आपल्या मनटावर टॅटू काढला होता. २००९मध्ये हृतिकने एक्स वाईफ सुझान खानसोबत आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर टॅटू काढला होता. स्टार ऑफ डेविडचा हृतिक आणि सुझानने टॅटू काढला होता. यामधून या दोघांमधील बाँडिग दिसत होती. पण २०१४ मध्ये दोघेही वेगळे झाले.

कंगना रनौतचा हटके टॅटू 

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना रनौतच्या मानेवर टॅटू आहे. हा टॅटू कंगनाचा धाडसी स्वभावाचे प्रतीक असून यामध्ये क्राऊन विंग्जमध्ये तलावर आहे. इतकेच नाहीतर कंगनाच्या पायावर देखील लिटिल एंजलाचा टॅटू आहे. कंगनाने हा टॅटू आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी काढला आहे.

सैफ अली खानचा हातावरील टॅटू 

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने करीनाच्या प्रेमाप्रती हातावर टॅटू काढला होता. टॅटू काढण्यासाठी सैफ अली खानने इंग्लंडचा ख्यातनाम फूटबॉलपटू डेविड बॅकहम याच्यापासून प्रेरणा घेतली. डेविड बॅकहम आपल्या बायकोचे नाव देवनागरीमधून हातावर लिहिले होते. त्याचप्रमाणे सैफने देखील करीनाचे नाव हातावर लिहिले होते.

दीपिका पादुकोणचा RK टॅटू 

जेव्हा रणबीर कपूरसोबत दीपिका पादुकोण रिलेशनमध्ये होती, तेव्हा दीपिकाने मानेवर एक सुरेख टॅटू काढला होता. रणबीरच्या नावाची अक्षरे RK असे कलात्मक पद्धतीचा टॅटू दीपिकाने काढला होता. परंतु दोघांचा बेक्रअप झाल्यानंतर तिने तो टॅटू काढून टाकला. त्यानंतर तिने अजूनपर्यंत कोणताही शरीरावर टॅटू काढला नाही.

अर्जुन कपूरचा आईवरील प्रेम व्यक्त करणारा टॅटू 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने आईवरील प्रेम व्यक्त करणारा टॅटू काढला आहे. आपली आई मोना कपूरवर असणारे प्रेम दाखवण्यासाठी ‘माँ’ असे त्याने देवनागरीमध्ये लिहिले आहे.