परदेशात भारताचा अपमान केल्याप्रकरणी वीर दास अडचणीत, तक्रार दाखल झाल्यानंतर मागितली माफी

bollywood comedian actor vir das apologizes for derogatory statements against india in i come from two indias after filed complaint against him
परदेशात भारताचा अपमान केल्याप्रकरणी वीर दास अडचणीत, तक्रार दाखल झाल्यानंतर मागितली माफी

भारतातील प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि बॉलिवूड अभिनेता वीर दास याने अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये स्टँड अप कॉमेडी शोदरम्यान एक कविता सादर केली. या कवितेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या कवितेत वीर दासने भारतातील महिला आणि देशाच्या प्रतिष्ठेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे अनेकांचे मत आहे. यामुळे सोशल मीडियावर नेटकरी त्याला ट्रोल करत आहे. याशिवाय मुंबई हायकोर्टाचे वकील आशुतोष जे दुबे यांनी वीर दासविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामुळे वीर दास चांगलाच अडचणीत सापडला आहे.

वीर दासने त्याच्या अधिकृत यूट्यूब अकाऊंटवरून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान या कॉमेडी शोच्या व्हिडिओमध्ये वीर दास भारताची आणि येथील महिलांच्या स्थितीची खिल्ली उडवताना दिसत आहे. या व्हिडिओचे शीर्षक COM FROM 2 INDIAS असे आहे. व्हिडिओमध्ये वीर दास म्हणतोय की, ‘मी अशा भारतातून आलोय, जेथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होतो’.

वीर दासविरोधात तक्रार दाखल 

वीर दासच्या या वक्तव्यानंतर अनेक भारतीयांकडून संताप व्यक्त करत जोरदार टीका करत आहे. त्याचवेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशुतोष दुबे यांनी वीर दासविरोधात तक्रार दाखल केली आहे. आशुतोष दुबे हे मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर वकील आहेत आणि भाजप-महाराष्ट्र पालघर जिल्ह्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. आशुतोष दुबे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून वीर दासविरोधात तक्रार नोंदवल्याची माहिती दिली आहे.

आशुतोष दुबे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वीर दास परदेशात भारतीय लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. व्हिडिओमागील हेतू देशातील लोकांमध्ये भीती आणि द्वेष निर्माण करण्याचा असल्याचे दिसतेय. एवढेच नाही तर, वीर दासने पीएम केअर फंडावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणीही केली आहे.

मात्र या चौफेर टीकेनंतर वीर दासने त्याच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली लागली आहे. वीर दासने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक निवेदन जारी करत अमेरिकेत भारताबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. यात त्याने म्हटले की, भारताचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.

ज्यात त्याने पुढे लिहिले की, ‘व्हिडिओमधील एकाच विषयावर लोकांची भिन्नभिन्न मत समोर येत आहेत. मी जे काही बोललो ते काही रहस्य नाही जे लोकांना माहितच नाही. माझ्या व्हिडिओवर निषेध नोंदवला जात आहे, जे चुकीचे आहे. मला माझ्या देशाचा अभिमान आहे आणि तो अभिमान दुसऱ्या देशाला घेऊन जातो. माझा उद्देश देशाचा अपमान करण्याचा नव्हता तर सर्व समस्या असूनही भारत देश महान आहे याची आठवण करून देण्याचा होता.


Amravati Riots: अमरावती हिंसाचारात रझा अकादमीसह भाजपा, युवासेनेचाही समावेश? पोलिसांचा गृह विभागाला अहवाल