जॅकलिन फर्नांडिस सलमानच्या ‘दबंग टूर’मधून आऊट, ही अभिनेत्री होणार सहभागी

bollywood daisy shah to replace jacqueline fernandez in salman khan da bangg tour amid ongoing controversy
जॅकलिन फर्नांडिस सलमानच्या 'दबंग टूर'मधून आऊट, ही अभिनेत्री होणार सहभागी

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. २०० कोटींच्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने तिच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली. या नोटीसीमुळे तिला भारत सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. अशातच सोमवारी जॅकलिनविरोधात ईडीने पुन्हा एकदा समन्स जारी केला. ज्यानुसार जॅकलिनला ८ डिसेंबरला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. मात्र या प्रकरणामुळे जॅकलिनसमोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतायत.

जॅकलिनच्या या प्रकरणाचा फटका अभिनेता सलमान खानला देखील सहन करावा लागणार आहे. कारण जॅकलिनमुळे सलमान खानची दबंग टूर रद्द होणार असल्याची चर्चा सुरु झालीय. कारण सलमान खानच्या दबंग टूरमधील जॅकलिन ही महत्त्वाची मेंबर होती. परंतु तिला देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आल्याने ही टूर रद्द होणार की काय असे म्हटले जातेय. परंतु टूर रद्द करण्याऐवजी जॅकलिनच्या जागी सलमान खान डेजी शाहला टूरचा मेंबर करणार असल्याचे म्हटले जातेय. यावर आत्ता डेजी शाहने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

जॅकलीनला रिप्लेस करण्यावर डेजी शाहने सांगितले की, मला यासंदर्भात अद्याप काही माहित नाही. रियाधमध्ये होणाऱ्या दबंग टूरसाठी सलमानचा भावोजी आयुष शर्मा, प्रभुदेवा, सुनील ग्रोव्हर, सई मांजरेकर, कमाल खान, शिल्पा शेट्टीसह अन्य सेलिब्रिटी स्टार सहभागी होणार आहेत. या लिस्टमध्ये जॅकलिन फर्नांडिसचे नाव देखील घेतले जात होते. मात्र जॅकलिनच्या या कॉन्ट्रोवर्सीनंतर टूरमधून तिचे नाव हटवण्यात आले आहे.