Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'द इंटर्न' सिनेमात दीपिकासह पुन्हा दिसणार बिग बी

‘द इंटर्न’ सिनेमात दीपिकासह पुन्हा दिसणार बिग बी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड महानायक बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. आगामी ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून एकत्र काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात यापूर्वी अभिनेता ऋषी कपूर झळकणार होते मात्र त्यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांना साईन करण्यात आले. बिग बी आणि दीपिकाने ‘पीकू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते, या चित्रपटाला प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली होती.

दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणने या बहुचर्चित सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज केले आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंवरून पहिले पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘माझे सर्वात खास सहकलाकार अमिताभ बच्चन यांच्यासह पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या बॉलिवूड रिमेकमध्ये तुमचं स्वागत आहे अमिताभ बच्चन.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

- Advertisement -


हॉलीवूड दिग्दर्शक नॅन्सी मेयर्सच्या दिग्दर्शित द इंटर्न हा हॉलिवूड सिनेमा २०१५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात ऐनी हॅथवे आणि सुप्रसिद्ध हॉलिवूड स्टार रॉबर्ट डी नीरो मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाच्य हिंदी रिमेकची घोषणा झाली. या हिंदी रिमेकमध्ये अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटाची कथा एका एकाकी पडलेल्या वृद्धाच्या आयुष्याभोवती फिरणारी आहे. वयाच्या ७० व्या वर्षी जेथे शरीर ताकदीने साथ देत नाही अशावेळी हा वृद्ध एका कॉर्पोरेट जगताशी जोडला जातो. पत्नीच्या निधनानंतर एकाकी पडलेला हा वृद्ध जीवनाला कंटाळलेला असतो. परंतु ७० व्या वर्षी कॉर्पोरेट जगतात जोमाने, आनंदाने काम करत आपले आयुष्य व्यस्त करतो. यावेळी कामाप्रती असलेली आस्ता आणि मेहनतीवर तो अगदी कमी वेळेत यशाचे शिखर गाठतो. ऑफिसमधील प्रत्येकाशी जुळवून घेतो. याचदरम्यान तो मसाज थेकपिस्टच्या प्रेमात पडतो, अशी एकंदरीत वृद्धाची कॉर्पोरेट जगतातील यशस्वी वाटचाल करणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाच्या दृष्टीने जग कसे आहे हे या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ‘म्हातारपणात तुम्ही काय काम करणार’ असे म्हणणाऱ्यांना एकप्रकारे या सिनेमातून चपराक लगावली जाणार आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -