घरताज्या घडामोडीVideo: बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका म्हणाली, माणसाला प्राण्यांपासून वाचण्याची गरज नाही तर...

Video: बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका म्हणाली, माणसाला प्राण्यांपासून वाचण्याची गरज नाही तर…

Subscribe

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले. म्हणून अनेक राज्यात अडकलेले मजूर सध्या घरी परतत आहेत. दरम्यान नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिबट्याच्या मागून मजूर प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका शगुफ्ता रफीकने ट्विट केला आहे. हे ट्विट करताना लेखिकेने लिहिले आहे की, ‘माणसाला माणसापासून वाचवण्याची गरज आहे, प्राण्यांपासून नाही.’ बॉलिवूडच्या लेखिकेच्या या ट्विटला चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शगुफ्ता रफीकने रिट्विट केलेला हा व्हिडिओ उत्तराखंडमधील जिम कॉर्बेटच्या परिसरातील आहे. या व्हिडिओत एक बिबट्या ज्या रस्त्यावरून जात आहे. त्यामागून पाच मजूर जात आहेत. या मजूराच्या हातात टॉर्च देखील आहे.

- Advertisement -

बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका शगुफ्ता रफीक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सद्य परिस्थितीवर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे मत मांडत असते.

- Advertisement -

लॉकडाऊन दरम्यान सध्या अनेक परप्रांतीय मजूर आपल्याला राज्यात पायपीट करू जात आहे. यामध्ये अनेक मजूरांचा जीव देखील जात आहे. औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परप्रांतीय १६ मजूर ठार झाले.


हेही वाचा – प्रियांकाला हॅकर्सची धमकी; …’नाहीतर तुझा पर्सनल डाटा लीक करू’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -