घरताज्या घडामोडीशेखर कपूर यांच्या 'या' ट्विटने बॉलीवूडमध्ये खळबळ

शेखर कपूर यांच्या ‘या’ ट्विटने बॉलीवूडमध्ये खळबळ

Subscribe

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनलॉकची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली असून केंद्र सरकारने नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या काळात अनेकांचे रोजगार देखील गेले आहेत. तसेच चित्रपटसृष्टीला देखील याचा मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर शेखर कपूर यांनी ट्विट केले असून बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कोरोना व्हायरसमुळे अनेकांचे रोजगार गेले असून चित्रपटसृष्टीलाही याचा फटका बसला आहे. तसेच अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहेत. पण, पुरेसे सिनेमा हॉल न मिळाल्यामुळे निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. ते म्हणतात की, ‘सिनेमा हॉल अजून एक वर्ष सुरू होणार नाहीत’, त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले शेखर कपूर?

‘पुढच्या एका वर्षापर्यंत चित्रपटगृह उघडणार नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत पहिल्या आठवड्यात १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई होण्याचे प्रमाण आता बंद होणार आहे. त्याचप्रमाणे थिएट्रिकल स्टार सिस्टम बंद पडणार आहे. त्यामुळे अनेकांना चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग स्वीकारावा लागेल किंवा त्यांना स्वत: च्या अ‍ॅप्सद्वारे चित्रपट प्रसिद्ध करावा लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सोशल डिस्टंसिंग नक्की कुणासाठी? पोलिसांकडून डबलसीट दुचाकीस्वारांवर जबरी कारवाई


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -