घरमनोरंजनपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणावर बॉलीवूडच्या दिग्दर्शकाचं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणावर बॉलीवूडच्या दिग्दर्शकाचं ट्विट

Subscribe

देशात खोटं पसरवण्यात येत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चाला संबोधित केले. या भाषणात त्यांनी सुधारित नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशात सुरु असलेल्या आंदोलनांवर पंतप्रधानांनी आपले मौन तोडले. देशात खोटं पसरवण्यात येत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, “सुधारित नागरिकता दुरुस्ती कायद्याचा कोणावरही परिणाम होणार नाही. काही अर्बन नक्षली खोटं पसरवत आहेत. तुम्ही सुशिक्षित आहात. कायद्याचे वाचन तरी करा.” यावर बॉलीवूडचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचे ट्विट

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विट केले की, ‘आता तर खुद्द पंतप्रधानांनी सांगितले आहे की, मुस्लिमांना या कायद्यामुळे कोणताच फरक पडणार नाही. आनंदाची गोष्ट आहे.’ दरम्यान अनुभव सिन्हा यांच्या ट्विटवर लोक मोठ्या संख्येने व्यक्त होत आहेत.

- Advertisement -

देशात कुठे आहे डिटेंशन सेंटर?

रामलीला मैदानावर रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “या कायद्यामुळे कोणत्याही मुस्लिमाला डिटेंशन सेंटरमध्ये रहावे लागणार नाही. भारतात कुठे आहे डिटेंशन सेंटर? ही माणसं खोटं बोलून देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत. तुम्ही यांच्या बोलण्यात येऊ नका. तुम्हीच विचार करा की एकाच अधिवेशनात आमचं सरकार दिल्लीतील लोकांना घरं देण्यासाठी विधेयक आणतं आणि दुसऱ्याच क्षणी आम्ही जनतेला देशातून काढून टाकण्यासाठी विधेयक आणू का? तुम्ही या लोकांचा हेतू लक्षात घ्या. हे माणसं तुमच्यात भांडणं लावत आहेत.”

हेही वाचा – संजू बाबाने ‘केजीएफ- चॅप्टर २’चा शेअर केला पहिला लूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -