वर्षभर लपवली लग्नाची बातमी, विक्रम भट्ट ५२ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत

bollywood director vikram bhatt Secretly Got Married To Shwetambari Soni Last Year
वर्षभर लपवली लग्नाची बातमी, विक्रम भट्ट ५२ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत

बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक विक्रम भट्ट (vikram bhatt) सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. विक्रम भट्ट यांनी वयाच्या ५२व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. विक्रम भट्ट यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव श्वेतांबरी सोनी असून त्यांनी गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान श्वेतांबरीसोबत लग्नगाठ बांधली. अजूनपर्यंत त्यांनी आपले हे दुसरं लग्न सीक्रेट ठेवलं होत. (vikram bhatt secretly got married to shwetambari soni last year)

इंग्रजी वेबसाईट टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विक्रम भट्ट आणि श्वेतांबरी सोनीसोबत गेल्या वर्षी लग्न केलं होत. या लग्नाबाबत त्यांनी आपल्या नातेवाईकांव्यतिरिक्त जास्त कोणाला सांगितले नव्हते. व्रिकम भट्ट यांच्या जवळच्या सुत्राने सांगितले की, श्वेतांबरी सोनी आणि त्यांनी लग्नाबाबतची गोष्टी खूप प्रायव्हेट ठेवली होती.

आज, बुधवारी विक्रम भट्ट यांनी श्वेताबंरीच्या वाढदिवसानिमित्ताने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. दोघांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून विक्रम भट्ट यांनी एक छानसी पोस्ट लिहून श्वेतांबरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikram Bhatt (@vikrampbhatt)

दरम्यान श्वेतांबरी सोनी नेहमी विक्रम भट्ट यांच्यासोबती रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावर्षी जूनमध्ये श्वेतांबरीने विक्रम भट्ट यांच्यासोबत एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना श्वेतांबरीने लिहिले होते की, ‘मेरा हमेशा के लिए पलक झपकने वाला साथी’ यासोबत तिने #love #husband #nature असे देखील हॅशटॅग लिहिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shwetambari Soni (@shwetaambari.soni)

विक्रम भट्ट यांनी यापूर्वी आदिती भट्टशी लग्न केलं होतं. त्यांना कृष्णा भट्ट नावाची एक मुलगीही आहे. पण १९९८ मध्ये विक्रम भट्ट आणि आदिती भट्ट यांच्यात घटस्फोट झाला. यानंतर विक्रम यांनी अभिनेत्री सुष्मिता सेना आणि अमिषा पटेल यांना डेट केलं होत. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते, असं म्हटलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shwetambari Soni (@shwetaambari.soni)


हेही वाचा – आयटम नंबर फेम अभिनेत्रीचे १६ व्या वर्षी वेटरचे काम, मिळाली वाईट वागणूक