घरताज्या घडामोडीदिव्या खोसला Oops Moment ची झाली शिकार; व्हिडिओ व्हायरल

दिव्या खोसला Oops Moment ची झाली शिकार; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

दिव्याच्या या Oops Moment चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच तिने ज्या शिताफीने ही परिस्थिती सांभाळली आहे. त्यामुळे नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

सध्या मुंबईत सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये वेगवेगळे डिझायनर आपले कलेक्शन जगासमोर दाखवत आहे. या फॅशन शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. याशिवाय अभिनेत्री आणि टी-सीरिजचे एमडी भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसलाने देखील रॅम्पवर जलावा दाखवला आहे.  दिव्या रॅम्पवॉक करताना खुपच सुंदर दिसत होती. तिने आत्मविश्वासाने रॅम्पवॉकला सुरुवात केली मात्र काही पावलानंतर तिची गडबड झाली. ती रॅम्पवॉक करत असताना अचानक दिव्याच्या लेहंग्याचे हुक तुटले. तरी देखील तिने अशा परिस्थितीत समजूदारपणे रॅम्पवॉक पूर्ण केला.

- Advertisement -

दिव्या लॅक्मे फॅशन वीकच्या पाचव्या दिवशी रॅम्पवर उतरली होती. लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिव्या डिझायनर Krsna Couture साठी शो स्टॉपर बनली होती. दिव्याने ग्रे रंगाचा लेहंगा घातला होता. त्यावर तिने डीप फ्रंट नेकलाइन ब्लाऊज घातला होता. तसंच गळ्यात छानसा हार घातला होता. मात्र रॅम्पवॉक करताना अचनाक तिच्या लहंगचा हुक तुटला. तरी देखील तिने शिताफीने लेहंगा हाताळला आणि आत्मविश्वासाने रॅम्पवॉक पूर्ण केला. दिव्याचा यादरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे.

- Advertisement -

अनिल शर्माच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथींयो’ या चित्रपटाच्या माध्यमातून २००४ साली दिव्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘लव्ह टुडे’ या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. त्यानंतर दिव्या टी सीरिजचे चेअरमन आणि मॅमेजिंग डायरेक्टर भूषण कुमारसोबत २००५ साली विवाहबंधनात अडकली. दिव्याला एक मुलगा आहे. दिव्याने लग्नानंतर अॅक्टिंग सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळली.

त्यानंतर तिने ‘रॉय’, ‘खानदानी शफाखाना’, ‘बाटला हाऊस’, ‘मरजांवा’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०१४ साली तिने ‘यारियां’ चित्रपटाचे दिग्दर्शिन केलं. तसंच तिने २०१६ मध्ये ‘सनम रे’ या चित्रपटाचे देखील दिग्दर्शिन केलं. आता ती पुन्हा एकदा अभिनयाकडे वळणार आहे. ‘सत्यमेव जयते २’ या जॉन अब्राहमच्या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – Bigg Boss 13 : ‘सिद्धार्थने दिलेली अॅसिड फेकण्याची धमकी’ आणि…शिल्पाने केला धक्कादायक खुलासा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -