bollywood drug case: शाहरुखच्या KKR टीमच्या पार्टीत अनेकांनी ड्रग्ज घेतले, शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा

bollywood drug case sherlyn chopra on aryan khan drugs case unveils shahrukh khan kkr drugs party without naming him
bollywood drug case: शाहरुखच्या KKR टीमच्या पार्टीत अनेकांनी ड्रग्ज घेतले, शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा

मुंबईतील एका क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीने अटक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे बॉलिवूडमधील मोठे ड्रग्ज रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेते शाहरुख खानच्या समर्थनार्थ उभे राहिले असून आर्यन खानबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. पण या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रोने शाहरुख खानविरोधातही अप्रत्यक्षरित्या ड्रग्ज घेतल्याचा मोठा आरोप केला आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने शाहरुख खानच्या आयपीएल फ्रँचायझी टीम केकेआरच्या पार्टीत अनेकांनी ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप एका मुलाखतीत केला आहे. पण यात तिने कोणाचेही नाव जाहीर केले नाही. परंतु शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआर टीमचा थेट उल्लेख केला आहे. शर्लिनने ही मुलाखल तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. ही मुलाखत जुनी असली तरी आर्यन खानच्या अटकेनंतर ती मोठ्य़ा प्रमाणात व्हायरल होत आहे.

… आणि पाहून धक्काच बसला

या पार्टीबद्दल बोलताना शर्लिन म्हणाली की, “जेव्हा मला नाचताना थकवा आणि घाम येऊ लागला, तेव्हा मी वॉशरूममध्ये गेले. त्यावेळी मी वॉशरूमचा दरवाजा उघडला. जेव्हा मी दार उघडले तेव्हा मी जे पाहिले ते पाहून मला खूप मोठा धक्काचं बसला.”

NCB raid on Mumbai cruise : आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी

सर्व व्हाईट पावडर घेत होत्या

“मी विचारात पडले की मी कोणत्या चुकीच्या ठिकाणी तर पोहचले नाही ना? त्यावेळी वॉशरुममधील आरश्यासमोर उभ्या राहून अनेक सिने स्टारच्या पत्नी व्हाइट पावडर (ड्रग्ज) घेत होत्या. जेव्हा अचानक मी हे सर्व दृश्य पाहिले तेव्हा मला धक्का बसला. मी त्यांच्याकडे पाहून एक स्मित दिलं आणि दुर्लक्ष करणं चांगले मानले.”

“मी पाहिले की, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पार्टी चिल करत होते. मी तिथल्या प्रत्येकाला माझी ओळख करुन दिली. यानंतर शाहरुख आणि त्याच्या मित्रांना भेटून तिथून निघाले. त्या दिवसानंतर मला समजले की, बॉलिवूडमध्ये कोणत्या प्रकारच्या पार्ट्या होतात.”

शर्लिन चोप्रा अनेक दिवसांपासून बॉलिवूडबद्दल करतेय मोठे खुलासे

शर्लिन चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल अनेक नवनवीन खुलासे करत आहे. अशातच आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर शर्लिनने बॉलिवूड अभिनेता शाहरुखच्या केकेआर टीमच्या पार्टीमध्येही ड्रग्ज घेतल्याचे आरोप केले आहेत. मात्र यात तिने कोणाचेही नाव घेतले नाही.आर्यन खानबद्दल बोलायचे झाल्यास त्याला ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी दिली आहे.