Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Drug Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने लग्न करण्यासाठी केला जामीन अर्ज

Drug Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने लग्न करण्यासाठी केला जामीन अर्ज

Related Story

- Advertisement -

दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूतनंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. याप्रकरणी गेल्या महिन्यात सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने अटक करण्यात आली होती. आता सिद्धार्थ पिठानीने कोर्टात जामीन अर्ज दाखल केला आहे. सिद्धार्थवर सुशांतला ड्रग्ज सप्लाय करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने जामीनाची मागणी केली आहे. सिद्धार्थचे वकील तारक सईद यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. सिद्धार्थ पिठानीचे लग्न असल्यामुळे त्याने जामीन मागितला आहे. सिद्धार्थकडून करण्यात आलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे की, त्याचे लग्न २६ जूनला हैदराबादमध्ये होणार होते. त्यामुळे सिद्धार्थाने कोर्टात लग्नाची पत्रिका जमा केली करून लग्नासाठी जामीनाची मागणी केली आहे. पण अलीकडेच सिद्धार्थ लग्न केले होते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान याप्रकरणाची कोर्टाने सुनावणी १६ जूनपर्यंत तहकूब केली आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी १४ जूनला सुशांत सिंह राजपूतने वांद्र्यातील आपल्या घरात आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूनंतर व्हाट्सअॅप चॅटच्या आधारे बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीची सुरुवात झाली. याप्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली होती आणि त्यांना अटक करण्यात देखील आले होते.


हेही वाचा – सुशांतच्या वडीलांची चित्रपटांवर बंदी घालण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली


- Advertisement -

 

- Advertisement -