Bollywood Drug Probe: दीपिका,सारा आणि श्रध्दाला NCB ने बजावला समन्स!

दीपिका, सारा,श्रध्दा

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनही समोर आलं आहे. सुशांतची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीच्या पथकानं अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांची नावं समोर आली आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रध्दा कपूर यांना एमसीबीने समन्स बजावला आहे. या अभिनेत्री ड्रग्ज मागवत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. आता लवकरच त्यांची एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. पुढील ३ दिवसांत या अभिनेत्रींना चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात १८ जणांना एनसीबीने अटक केली आहे.