घरताज्या घडामोडीBollywood Drugs Case: सिद्धार्थ पिठाणी नंतर सुशांत सिंहचा नोकर नीरज आणि केशवला...

Bollywood Drugs Case: सिद्धार्थ पिठाणी नंतर सुशांत सिंहचा नोकर नीरज आणि केशवला NCBकडून समन्स

Subscribe

सिद्धार्थ पिठाणीनंतर नीरज आणि केशव NCBच्या रडावर

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput )मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले. अनेक बॉलिवूड कलाकार यामुळे NCBच्या रडारवर होते. सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात NCBने पुन्हा एकदा कारवाई करायला सुरुवात केली आहे. सुशांतचा मित्र आणि प्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणीच्या (Siddharth Pithani ) अटकेनंतर आता सुशांत सिंहचा नोकर नीरज (Neeraj) आणि केशव (Keshav) यांना चौकशीसाठी NCBने समन्स बजावले आहेत. त्यामुळे सिद्धार्थ पिठाणीनंतर नीरज आणि केशव NCBच्या रडावर असणार आहेत. NCBच्या चौकशीपासून लांब पळून नीरज आणि केशव गेल्या ८ महिन्यांपासून मुंबईपासून बाहेर आहेत. ऑगस्ट महिन्यात दोघेही मुंबईत आले आणि सेलिब्रेटींच्या घरी काम करत होते. (Bollywood Drugs Case: Sushant Singh Rajput servant Neeraj and Keshav summoned by NCB after Siddharth Pithani arrest)


सुशांतचे नोकर नीरज आणि केशव यांची याआधीही CBI आणि NCBच्या टिमकडून चौकशी करण्यात आली आहे. मात्र पुन्हा एकदा NCBच्या टिम त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यासाठी दोघांनाही NCBकडून समन्स बजावण्यात आले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या चौकशीत सुशांतचा नोकर नीरजने अनेक महत्त्वाचे खुलासे केले होते. सुशांत,रिया चक्रवर्ती,सैमुअल मिरांडा,शौविक चक्रवर्ती आणि दीपेश सावंत यांसारख्या अनेकांविषयी अनेक महत्त्वाचे खुलासे नीरजने केले होते.

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सध्या CBI,ED आणि NCB या तीन केंद्रीय संस्थांकडून करण्यात येत आहे. NCBने ५ मार्च २०२१ ला मुंबई स्पेशल NDPS कोर्टात ३३ जणांच्या विरोधात बाराशे पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर लोकांची नावे होती. सशांत सिंहचा १४ जून २०२० रोजी त्याच्या राहत्या घरात मृत्यू झाला. सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मात्र ही हत्या असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – Video:शिल्पा शिंदेचा अॅक्टिंगला फूलस्टॉप,अभिनय सोडून करतेय बांधकाम क्षेत्रात काम!

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -