Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Bollywood Drugs Connection: एजाज खानला कोरोनाने गाठलं, NCBच्या गोटात चिंतेचे वातावरण

Bollywood Drugs Connection: एजाज खानला कोरोनाने गाठलं, NCBच्या गोटात चिंतेचे वातावरण

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला एनसीबीने (NCB) अटक केली होती. पण आता एजाज खानला कोरोनाने गाठले असून त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे एजाज खानला क्वारंटाईन करण्यात आले असून लवकरच रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. पण यामुळे एनसीबीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत, कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अशा अनेक जणांची नावे समोर आली होती. त्यानंतर ३० मार्चला याप्रकरणात एजाज खान असल्याचे समोर आले. ३० मार्चला राजस्थानहून मुंबईत परताच एनसीबीने एजाजला एअरपोर्टवरून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी झाल्यानंतर अटक केली. मग त्याला कोर्टासमोर हजर केले आणि ३ एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती.

एजाज खानच्या घरी त्याच दिवशी म्हणजेच ३० मार्चला धाड टाकण्यात आली होती. त्यादरम्यान काही गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. पण त्या गोळ्या आपल्या बायकोच्या असल्याचे एजाज खान म्हणाला होता. माझ्या घरी फक्त ४ झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला आहे आणि या गोळ्या एन्टीडिप्रेसस म्हणून ती घेत होती, असे त्याने स्पष्ट केले होते.

- Advertisement -

दरम्यान काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर शादाबा बटाटाच्या चौकशीतून एजाज खानचे नाव समोर आले. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला एनसीबीने अटक केली होती.  त्यावेळेस जवळपास २ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. शादाब बटाटावर मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्ज सप्लाय करत असल्याचा आरोप लावला आहे.


हेही वाचा – अक्षय कुमारनंतर सेटवरील तब्बल ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह


 

- Advertisement -