घरताज्या घडामोडी'मुलींच्या लहान कपड्यांमुळे उद्धवस्त झाले माझे करिअर'; बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याचा खुलासा

‘मुलींच्या लहान कपड्यांमुळे उद्धवस्त झाले माझे करिअर’; बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याचा खुलासा

Subscribe

बॉलिवूड चित्रपटातील लोकप्रिय खलनायक रंजीत (Ranjeet) सध्या चित्रपटापासून खूप दूर आहेl. तरी देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडे अभिनेते रंजीत यांनी करिअरबाबत असा काही खुलासा केला आहे, ज्यामुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. अभिनेते रंजीत म्हणाले की, ‘चित्रपटात केलेल्या बलात्कार सीनमुळे माझी प्रतिमा खूप खराब झाली होती. या सीनमुळे मला करिअरमध्ये जास्त यश मिळाले नाही.’

एका वृत्तसंस्थेशी बातचित करताना रंजीत म्हणाले की, ‘त्या दिवसांमध्ये कोणताही चित्रपट सही करण्यापूर्वी कथा ऐकत नव्हतो. मी कधीची कोणत्या स्क्रिप्टमध्ये दखल घेतली नाही आणि मला कसलीही गरज भासली नाही. मला खलनायकाची भूमिका करायला कोणतीही समस्या नव्हती. अर्थात सुरुवातीला माझ्या कुटुंबाला समस्या होती, परंतु नंतर त्यांना समजले की, हे माझे काम आहे. मी कधी आपल्या करिअरचे नियोजन केले नाही. माझ्या रस्त्यात जे काही आले, त्यात मी सामील होत गेलो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranjeet (@ranjeetthegoli)

- Advertisement -

पुढे रंजीत म्हणाले की, ‘त्या दिवसांमध्ये बलात्कार सीन वल्गर वाटतं नव्हते. सोबत जी हिरोईन असेल तिला कम्फर्टेबल करावे, हे माझे काम होते. पण नंतर लोकं मला रेप स्पेशलिस्ट म्हणून बोलवू लागले होते. त्यावेळेस आता सारखी परिस्थिती नव्हती आणि लव्ह मेकिंग सीन नव्हते. आमच्या एक सेट फॉर्मट होता – हिरो, हिरोईन, कॉमेडियन, खलनायक, बहीण, आई वडील झालं. जर यापेक्षा जास्त काही केलं गेलं तर म्हटलं जात होत की, असं करायचं होत तर ब्लू फिल्म करा? मी नेहमी मस्करी बोलायचो की, फॅशनने माझं करिअर उद्धवस्त केलं. मुलींनी इतके छोटे-छोटे घालण्यास सुरुवात केली की, मला खेचायला काही राहिलेच नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranjeet (@ranjeetthegoli)

काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा’शोमध्ये रंजीत यांनी असा खुलासा केला होता की, ‘छेडछाडचा एक सीन पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी घरातून बाहेर काढले होते. त्यांच्या कुटुंबियांना लाज वाटत होती. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय अशा कामामुळे नाखुश होते. तेव्हा त्यांचे कुटुंबिय म्हणाले की, हे काही काम आहे? कोणता मेजर, ऑफिसर, एअरफोर्स ऑफिसर किंवा डॉक्टरचा रोल कर. वडिलांचं नाक कापलं आहेस. आता आम्ही अमृतसरमध्ये कोणतं तोंड घेऊन फिरू.’

- Advertisement -

हेही वाचा – ‘सैराट’मधील ‘बाळ्या’ आता छोट्या पडद्यावर


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -