घरमनोरंजन'अच्छे दिन कब आएंगे' गाण्याचे चक्क बोलच बदलले

‘अच्छे दिन कब आएंगे’ गाण्याचे चक्क बोलच बदलले

Subscribe

फन्ने खान चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'अच्छे दिन कब आएंगे' या गाण्यावर सुरु झालेल्या वादामुळे गाण्याचे शब्दच बदलून टाकले आहेत. या गाण्याचे बोल आता मेरे अच्छे दिन आए रे' असे करण्यात आले आहेत.

अच्छे दिन हमारे गले की हड्डी बन गयी है… असं वक्तव्य मध्यतंरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. अच्छे दिनची हड्डी फक्त भाजपच्याच नाही तर फन्ने खानच्याही गले की हड्डी बन गयी है, अशी माहिती समोर आली आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय एकत्र काम करत असलेल्या फन्ने खान या चित्रपटातील ‘अच्छे दिन आऐंगे’ हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. भाजपला अच्छे दिनची हड्डी बाहेर काढता येत नसली तरी फन्ने खानच्या निर्मात्यांनी मात्र गाण्याचे बोलच बदलून टाकले आहेत. ‘अच्छे दिन कब आएंगे’ असं असणाऱ्या या गाण्याचे बोल ‘मेरे अच्छे दिन अब आए रे’ असे करण्यात आले आहे. या बोल व्यतिरिक्त गाण्यात कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाही. गाण्याचे संगीत देखील आहे तेच आहे.

सौजन्य : युट्यूब

- Advertisement -

मोदींनी ‘अच्छे दिन’ची घोषणा केली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपल्याला जिंकून दिले तर देशाचे ‘अच्छे दिन आएंगे’ अशी घोषणा केली होती. निवडून आल्यानंतरही ‘अच्छे दिन आएंगे’ अशी घोषणा मोदींनी कित्येक भाषणांमध्ये केली होती. त्यामुळे या गाण्यातून सरकारला टोमणा मारल्याचे काही लोकांना वाटत होते. त्यामुळे या गाण्याला प्रचंड विरोध झाला. या गाण्याबरोबरच लोकांनी चित्रपटालाही विरोध केला आहे. चित्रपटाच्या गाण्यावरुन आणखी जास्त वाद चिघळू नये, यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी गाण्याचे बोलच बदलून टाकले आहेत.

गाण्याला विनाकारण राजकीय वादात अडकवलं गेलं – दिग्दर्शक

या चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, नुकतेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या गाण्यावर सुरु झालेल्या वादावर अतुल मांजरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अतुल यांनी सांगितले आहे की, ‘आमच्या गाण्याला विनाकारण राजकीय वादात अडवलं गेलं आहे’. त्याचबरोबर गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर लगेच अशा नकारात्मक प्रतिक्रिया येतील, याची त्यांना कल्पानाही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या अगोदरही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बरेच चित्रपट राजकीय आणि सामाजिक वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आपण बघितले आहेत. ‘ओएमजी’, ‘पीके’, ‘पद्मावत’, ‘ए दिल है मुश्किल’ हे त्याचे ताजे उदाहरणे आहे. आता फन्ने खान चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. परंतु, चित्रपट निर्मात्यांनी वेळीच समस्या हेरून त्या वादाला पूर्णविराम लागला.

फन्ने खान चित्रपटात काय आहे ?

फन्ने खान हा चित्रपट ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात एका टॅक्सी ड्रायवरचा स्वप्नांसाठी सुरु असणारा प्रवास दाखवला गेला आहे. त्याचे स्वप्न साकार होतात की नाही? हे दाखवले गेले आहे. या चित्रपटात अनिल कपूर, राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय यांनी भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -