घरताज्या घडामोडीबॉलिवूड- हॉलिवूड आलं एकत्र, स्थापन केली नवीन कंपनी!

बॉलिवूड- हॉलिवूड आलं एकत्र, स्थापन केली नवीन कंपनी!

Subscribe

इरॉस नाऊ ओटीटीचे १८ कोटी ८० लाख रजिस्टर्ड उपभोक्ता असून २ कोटी ६० लाख नियमित ग्राहक आहेत.

भारतातील बॉलिवूड चित्रपटांची निर्मीती करणाऱ्या इरॉस इण्टरनॅशनल कंपनीने आता हॉलिवूड कंपनीसोबत हात मिळवणी करत न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेन्जमध्ये एण्ट्री घेतली आहे. या नव्या कंपनीचं नाव इरॉस एसटीएक्स ग्लोबल कॉरपोरेशन असं आहे. ‘बदलापूर’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती इरॉस इण्टरनॅशनल कंपनीने  केली आहे.

एसटीएक्स एण्टरटेनमेंट कंपनी ही हॉलिवूडमधील एक स्टार्ट अप कंपनी आहे. हसलर्स आणि ब्रॅड मॉम यांसारख्या सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे. चीनमधील मोठ्या बाजाराकडे या दोन कंपन्यांचं लक्ष आहे. याशिवाय इरॉस नाऊचे स्वतःचे ओटीटी ग्राहकही आहेत.

- Advertisement -

इरॉस या कंपनीचं नाव बॉलिवूड सिनेसृष्टीत खूप महत्त्वाचं म्हणून घेतलं जायचं. कंपनीचं नाव मोठं करण्यात सिनेमांसोबतच याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मनेही मदत केली. त्यानुसार इरॉस नाऊ ओटीटीचे १८ कोटी ८० लाख रजिस्टर्ड उपभोक्ता असून २ कोटी ६० लाख नियमित ग्राहक आहेत.

कर्मचाऱ्यांना वेतनच नाही

गेल्या एक वर्षापासून कंपनीत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याची तक्रार सुरू आहे. दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे सध्याच्या कंपनीच्या सीईओला पदावरून कमी करण्यात येईल..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -