HomeमनोरंजनBollywood Gossips : या अभिनेत्रीला उंची नडली, कामं सुटली

Bollywood Gossips : या अभिनेत्रीला उंची नडली, कामं सुटली

Subscribe

आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, त्यात ऐश्वर्या राय बच्चनला मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्याची योजना होती. निर्मात्यांनी तिला ऑफरही दिली, पण ऐश्वर्याने ती नाकारली. त्याच दरम्यान निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्रीला या भूमिकेबाबत विचारणा केली मात्र निर्मात्यांनी निवडलेल्या दुसऱ्या अभिनेत्रीलाही फोटोशूटनंतर बाहेर पडावे लागले कारण ती मुख्य नायकापेक्षा 3 इंच उंच होती.

तो चित्रपट म्हणजे आमिर खान स्टारर ‘मन’हा चित्रपट. 1999 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. तुम्हाला माहित असेलच की यात मनीषा कोयराला ही मुख्य भूमिकेत होती आणि अनिल कपूर सहाय्यक भूमिकेत होता. या चित्रपटातील मनीषा आणि आमिरची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Bollywood Gossips: This actress lost her height and lost her job

खरंतर, आमिर खानला फायनल केल्यानंतर निर्मात्यांनी ऐश्वर्या रायला ऑफर दिली. मात्र तिने ही ऑफर नाकारली. त्यानंतर निर्मात्यांनी तब्बूला या भूमिकेसाठी विचारणा केली. तब्बूने या चित्रपटाचे फोटोशूटही केले होते, ज्यामध्ये ती आमिरपेक्षा उंच दिसत होती. तब्बू आमिर खानपेक्षा 3 इंच उंच होती. खुद्द आमिरला आणि निर्मात्यांना ते आवडले नाही म्हणून मनीषा कोयरालाला बदलून मुख्य भूमिका देण्यात आली. 2001 मध्ये तब्बूने याबाबत फिल्मफेअरशी चर्चा केली आणि आमिरसोबत काम करण्याबद्दल तिची उत्सुकता व्यक्त केली.

तब्बूने सांगितले होते की, तिने या चित्रपटासाठी आमिरसोबत फोटोशूट केले होते, पण त्यानंतर काय झाले हे तिला कधीच सांगितले गेले नाही. ती म्हणाला, “ मला आमिरसोबत चित्रपट करायला आवडले असते. ‘मन’साठी आम्ही एकत्र फोटोशूटही केले. त्यानंतर काय झाले, मला माहित नाही, पडद्यामागे काय चालले आहे ते मला अनेकदा समजत नाही.”

तब्बूने मुलाखतीत पुढे सांगितले की, “असे अनेकवेळा घडले आहे. प्रत्येक हिरोईनसोबत असे घडते.” फक्त मनच नाही तर तब्बूला गोविंदासोबत ‘कुंवरा’मध्ये काम करायचे होते, ज्यामध्ये उर्मिला मातोंडकरने नंतर काम केले . तब्बू म्हणते की तिला अनेकदा इंडस्ट्रीमध्ये निराशा आणि अपमानाचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा : Mukkam Post Devacha Ghar : देवाचं घर म्हणजे काय? उत्तर मिळणार 31 जानेवारीला


Edited By – Tanvi Gundaye