घरमनोरंजनशाहरुख, सलमान, कार्तिक, बिग स्क्रीनवर; कुणाचं नशीब उलघडणार, 2023 मध्ये रिलीज होतायत 'हे' चित्रपट

शाहरुख, सलमान, कार्तिक, बिग स्क्रीनवर; कुणाचं नशीब उलघडणार, 2023 मध्ये रिलीज होतायत ‘हे’ चित्रपट

Subscribe

आज नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र सरते 2022 हे बॉलिवूडसाठी काही खास ठरले नाही. 2022 मध्ये बॉलिवूडमधून फारसे दमदार चित्रपट प्रेक्षकांसमोर न आल्याने प्रेक्षकांची निराशा झाली. मात्र यंदा नवीन वर्षात बॉलिवूडकडून प्रेक्षकांना चित्रपटांचा मनोरंजन मसाला मिळणार आहे. यंदा बॉलिवूडमध्ये तगडी स्टारकास्ट असलेले एक दोन नाही तर 16 चित्रपट रिलीजच्या वाटेवर आहेत.

मात्र कोरोना आणि लॉकडाऊनपासून बॉक्स ऑफिसवर खूप संघर्ष करत आहे. 300 कोटींच्या आसपास कमाई करणारे बॉलिवूड चित्रपट 2022 मध्ये काही वेगळी कमाल करु शकले नाही. यात केवळ ब्रह्मास्त्र हा चित्रपट 270 कोटींच्या आसपास पोहचू शकला. मात्र यंदा शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या सुपरस्टार्सपासून कार्तिक आर्यन, वरूण धवन यांसारखे तरुण कलाकार मोठे प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. जाणून घेऊन 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये नेमके कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत.

- Advertisement -

1. पठाण

वर्षाची सुरुवाताच शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट ‘पठाण’ रिलीजहोणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण जबरदस्त अॅक्शन अंदाजात दिसणार आहे, तर जॉन अब्राहम खतरनाक विलनंच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘पठाण’मध्ये काही अप्रतिम अ‍ॅक्शन सेट पीस असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे, जे यापूर्वी कधीही न पाहिलेले आहेत. 25 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं बजेट जवळपास 250 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.

2. शहजादा

रोहित धवनच्या या चित्रपटात पहिल्यांदाच कार्तिक आर्यन अॅक्शन-ड्रामा स्टोरी घेऊन येत आहे. 10 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यात कार्तिकसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये बनणार असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

जवान, शहजादा और भाई जान

3. मैदान

फुटबॉलवर आधारित अजय देवगणचा मैदान हा चित्रपट यापूर्वीच बनवून रेडी होता. मात्र त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले जात होते. आता त्याची रिलीज डेट 17 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी निर्माता बोनी कपूर यांनी सुमारे 100 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जात आहे.

4. भोला

अजय देवगणचा भोला हा धमाकेदार अॅक्शन चित्रपट 30 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीझर आणि अजयचा समोर आलेला फर्स्ट लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्यामुळे ‘भोला’ प्रचंड हिट होणार असल्याचे सांगितले जात आहे. तमिळ हिट ‘कैथी’च्या या हिंदी रिमेकवरील या चित्रपटासाठी 80 ते 100 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

5. बवाल

‘दंगल’ आणि ‘छिछोरे’ सारखे सुपर हिट चित्रपटानंतर आता नितेश तिवारी बवाल हा नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 7 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट वर्णन वरुणच्या करिअरमधील बिग बजेट चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट्सनुसार ‘बावल’चे बजेट 100 ते 130 कोटींच्या दरम्यान आहे.

6. किसी का भाई किसी की जान

2023 मध्ये सलमान खान पुन्हा एकदा ईदच्या मुहूर्तावर धमाल करण्यास येत आहे. भाईजानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिलला रिलीज होत आहे. या चित्रपटात सलमानसह पूजा हेगडे, शहनाज गिल, जस्सी गिल, राणा डग्गुबती, व्यंकटेश आणि राम चरण अशी बडी स्टारकास्ट झळकणार आहे. सलमानच्या या चित्रपटाचे बजेट जवळपास 100 कोटी आहे.

7. रॉकी और राणी की प्रेमकथा

अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर दिग्दर्शक म्हणून करण जोहर सज्ज ढाला आहे. करणचा रॉकी और राणी की प्रेमकथा हा चित्रपट 28 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. यात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासोबत धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन देखील झळकणार असून या चित्रपटाचे बजेट 70 ते 90 कोटींपर्यंत सांगण्यात येत आहे.

8. जवान

तमिळ चित्रपटांमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीसोबत शाहरुख खानचा जवान हा चित्रपट 2 जूनला येणार आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा अशी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पॅन इंडिया लेव्हलवर धमाक करण्यास सज्ज असलेल्या ‘जवान’चे बजेट 200 कोटींच्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे. मात्र चित्रपटाच्या फर्स्ट लूकला मिळालेला लोकांचा प्रतिसाद पाहता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच हे बजेट वसूल करेल असे वाटते.

9. आदिपुरुष

प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉनने लीड असलेला आदिपुरुष हा चित्रपट रामायणापासून प्रेरित आहे. ओम राऊत यांचा हा चित्रपट नवीन वर्षाची सुरुवातीला रिलीज होणार होता, मात्र प्रेक्षकांचा टीझरला मिळालेला निगेटिव्ह रिस्पॉन्स पाहता याची रिलीज डेट पुढे ढकलली, आणि चित्रपटात काही सुधारणा केल्या जात आहेत. 16 जून रोजी रिलीज होणार्‍या या चित्रपटाचे बजेट आधीच 500 कोटी असल्याचे सांगितले जात होते.

10. सत्य प्रेम की कथा

कार्तिक आर्यनचा हा चित्रपट ग्रँड म्युझिकल स्टोरी म्हणून सांगितला जात आहे, चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी झळकणार असून त्याची रिलीज 29 जून रोजी ठेवण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट 50 ते 60 कोटींच्या जवळपास आहे.

11. अॅनिमल

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘Animal’ हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. ‘कबीर सिंग’ चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. रणबीर या चित्रपटात अशा अवतारात दिसणार आहे, जो प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही पाहिला नसेल. निर्मात्यांनी त्याचे बजेट 120 कोटी रुपये ठेवले आहे.

12. टायगर 3

ईदनंतर सलमान खानने दिवाळीतही बॉक्स ऑफिसवर दंबगगिरी करण्यास तयारी सुरु केली आहे. 10 नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या टायगर 3 मध्ये सलमान खानसह कतरिना कैफ झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानचाही एक कॅमिओ आहे. या चित्रपटाचं बजेट 200 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

13. बडे मियाँ छोटे मियाँ

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा हा धमाकेदार अॅक्शनपट असणार आहे. या चित्रपटाचे बजेट 300 कोटींवर जाणार आहे. 22 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

14. डंकी

2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी शाहरुख पूर्णपणे सज्ज आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर तो राजकुमार हिरानीच्या डंकी या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एक सोशल कॉमेडी असून तो 22 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे बजेट 100 कोटींच्या जवळपास आहे.

15. गणपत, मिशन ईगल, स्क्रू ढीला

वरील बिग बजेट चित्रपटांव्यतिरिक्त, टायगर श्रॉफकडे आणखी दोन मोठे अॅक्शन मसाला चित्रपट आहेत. यापैकीच एक विकास बहलचा क्रिती सेननसोबतचा ‘गणपत’ आहे. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीजच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वी टायगरचा ‘मिशन ईगल’ हा चित्रपटही सुरू झाल्याची बातमी आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत सारा अली खान झळकणार आहे. काही महिन्यांपूर्वी करण जोहरने टायगर श्रॉफसोबत ‘स्क्रू ढीला’ या अॅक्शनपटाची घोषणाही केली होती. टायगरसोबत रश्मिका मंदाना असेल असे बोलले जात आहे. निर्माते आता 2023 मध्येही टायगरवर आपले नशीब आजमावत आहेत.

16. कबीर खान-कार्तिक आर्यन फिल्म, अजय देवगण-नीरज पांडे फिल्म

2023 या दोन मोठ्या चित्रपटांव्यतिरिक्त, कार्तिक आर्यन कबीर खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात दिसणार आहे. मोठ्या स्केलवर बनवलेली ही एक अॅक्शन फिल्म असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे त्याचे बजेट 60-80 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

अजय देवगणनेही ‘भोला’मधील त्याचा लूक शेअर करण्यापूर्वी दिग्दर्शक नीरज पांडेसोबत त्याचा चित्रपट सुरू करण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पाविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु अजय आणि नीरज एकत्र चाणक्यवर आधारित चित्रपट बनवत असल्याचे बोलले जात आहे. हा बिग बजेट चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. कारण प्राचीन भारतावर आधारित या चित्रपटात भरपूर VFX काम असेल.

त्यामुळे 2023 मध्ये बॉलिवूडने बॉक्स ऑफिसवर आपली कमी झालेली ताकद पुन्हा दाखवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. शाहरुख, सलमानपासून अजय अक्षयपर्यंत आणि कार्तिक, टायगर, वरुण यांसारख्या तरुण स्टार्सपर्यंत निर्मात्यांची एक मोठी फौज कामाला लागली आहे. जर हे चित्रपट यशस्वी झाले तर नक्कीच बॉलीवूडचा व्यवसाय कोरोनापूर्वीच्या काळासारखा जोमाने होईल.


नाशिकच्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; अनेक कर्मचारी जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -