Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन happy birthday Rashmika: नॅशनल क्रश रश्मिका झाली २५ वर्षांची

happy birthday Rashmika: नॅशनल क्रश रश्मिका झाली २५ वर्षांची

Related Story

- Advertisement -

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या सालस सौंदर्य आणि अभिनयाची जादू निर्माण करणारी सर्वात टॉपची अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. आज दक्षिण भारतसह देशभरात रश्मिकाचे कोट्यावधी चाहता वर्ग आहे. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना साऊथनंतर आता बॉलिवूडमध्येही जलवा करण्यास सज्ज झाली आहे. अवघ्या काही काळातचं यशाचे शिखर गाठणारी रश्मिकाने आज वयाच्या २५ व्या वर्षात पदार्पण केले. तिच्या वाढदिवसानिमित्त लाखो चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून तिला शुभेच्छा देत आहे.

- Advertisement -

२०१६ मध्ये रिलीज झालेल्या Kirik Party या कन्नड सिनेमातून डेब्यू करणाऱ्या रश्मिकाने आत्तापर्यंत तमिळ, तेलगुसह अनेक सिनेमांमध्ये काम केले. Kirik Party या तिच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाचे साऱ्यांनी कौतुक केले. हा सिनेमा त्यावर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. रश्मिकाने आत्तापर्यंत १० ते ११ सिनेमांमध्येच काम केले. मात्र या सिनेमांमधील अभिनय आणि तिच्या दिलखेचक अदांना पसंती देणारा करोडोचा चाहता वर्ग आहे. २०२० मध्ये गुगलने रश्मिकाला नॅशनल क्रशचे टायटल दिले. यामुळे तिची प्रसिद्धीत दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.

मोठ्या पडद्यावर चेहऱ्यांवर हास्य ठेवणारी रश्मिकाने आयुष्यात अनेक चढ उताराचा सामना केला. याबाबत खूप कमी जणांना माहित आहे. कर्नाटकच्या विराजपेठा या गावात रश्किमाचा जन्म झाला. मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यामध्ये तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. दरम्यान महाविद्यालयीन काळापासून तिने मॉडेलिंग क्षेत्रात करियरला सुरुवात केली. यानंतर अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये ती झळकली. २०१५ मध्ये बेंगळूर येथे झालेला टॅलेंट हंट पुरस्कार तिच्या करियरमधील टर्निंग पाँइट ठरला. दरम्यान रश्मिकाच्या उत्कृष्ट अभिनयाची भुरळ दिग्दर्शक रिषभ शेट्टीला पडली. यानंतर वयाच्या अवघ्या १९ व्या तिला किरिक पार्टी सिनेमाची ऑफर आली. यानंतर तिचे संपूर्ण आयुष्य पालटले.

- Advertisement -

या चित्रपटाच्या सेटवर रश्मिका मंदाना आणि अभिनेता रक्षित शेट्टी यांची मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. रश्मिकाने रक्षितवरच्या प्रेमाची जगजाहीर कबुलीही दिली होती. याचदरम्यान २०१७ मध्ये दोघांचा साखपुडाही झाला. परंतु सर्वकाही सुरळीत असतानाच २०१८ मध्ये त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला. व दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर आजही दोघे एकमेकांसोबत पून्हा दिसले नाहीत. तसेच तीन वर्षे उलटून गेली तरी आपल्या नात्यातील दूराव्यावर एक शब्द काढला नाही.

रश्मिकाच्या वर्क फ्रिंटबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच ती अमिताभ बच्चन यांच्यासह ‘गुड बाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रासह ‘मिशन मजून’ या सिनेमातही ती झळकणार आहे. रश्मिका सध्या अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.


हेही वाचा- अक्षय कुमारनंतर सेटवरील तब्बल ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह


- Advertisement -