घरमनोरंजनठरलं ! आलिया -रणबीर ११ मे ला करणार लग्न

ठरलं ! आलिया -रणबीर ११ मे ला करणार लग्न

Subscribe

अभिनेता रणबीर कपूर आणि बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट ११ मे ला लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वहात आहेत. सोशलमिडीयावर सध्या या लग्नांचाच बोलबाला आहे, सध्या बॉलिवूडच्या एका कपलकडे सगळ्यांचच लक्ष आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट कधी लग्न याची चिंता त्यांच्यापेक्षा त्यांच्या चाहत्यांनाच आहे. आता चाहत्यांच्या लग्नाच्या तयारीला लागायला हरकत नाही. कारण या दोघांच्या लग्नाची पत्रिका तयार झाली आहे.

या दोघांची लग्नाची पत्रिका सोशलमिडीयावर जोरदार व्हायरल होतेय. या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबूली दिल्यावर, प्रेमाचा खुलेपणाचा स्विकार केल्यावर सगळ्यांना वेड लागलेत ते त्यांच्या लग्नाचे. त्यामुळे जोडीच्याच चर्चा सध्या सोशलमिडीयावर सुरू आहेत.

- Advertisement -

या व्हायरल झालेल्या पत्रिकेवर रणबीर आणि आलियाचं लग्न ११ मे ला होणार आहे. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. आजपर्यंत सेलेब्रेटी कपल डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देतात. मात्र या दोघांनी मुंबईत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आलिया आणि रणबीरची लग्नपत्रिका

 

- Advertisement -

साधी-सुंदर लग्न पत्रिका

रणबीर आणि आलियाची ल्गनपत्रिका अतिशय साधी आणि तितकीच सुंदर आहे. लग्नपत्रिका लाल रंगाची आहे. या लाल रंगाच्या पत्रिकेवर सोनेरी अक्षराने लिहीलं आहे. सध्या या दोघांच्या घरात जोरदार लग्नाची तयारी सुरू आहे. त्यामुळे ११ मे ची प्रतिक्षा आता सगळ्यांनाच आहे.

एप्रिल फुल !!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -