घरमनोरंजनhrithik roshan ने गरजवंताला रक्तदान करत चाहत्यांसमोर ठेवला नवा आदर्श

hrithik roshan ने गरजवंताला रक्तदान करत चाहत्यांसमोर ठेवला नवा आदर्श

Subscribe

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असतो. आनंद, प्रोत्साहन, मनोरंजन आणि विनोदाचे डोस तो या माध्यमातून देत असतो. या सुपरस्टारने आज ‘वर्ल्ड रँडम अॅक्ट ऑफ काइंडनेस’ डे निमित्त रक्तदान करत अनेकांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ह्रतिकचा रक्तगट अतिशय दुर्मिळ आहे. यात अनेक रुग्णांलयांमध्ये सध्या या दुर्मिळ रक्तगटाची टंचाई आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने स्वत: रक्तदान केल्याची माहिती दिली तसेच चाहत्यांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच रक्तदान दात्याच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर असते हे देखील सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

- Advertisement -

विशेष म्हणजे ह्रतिक रोशनने रक्तदान केले याचा संबंध काही चाहत्यांनी क्रिश चित्रपटाशी जोडला आहे. ह्रतिक रोशन रक्तदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पीटलमध्ये पोहचला होता. याचे फोटो अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोसह कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, मला सांगण्यात आले होते की, माझा ब्लड ग्रुप बी-निगेटिव्ह म्हणजे अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये या रक्तगटाची टंचाई असते. त्यामुळे मी असा निश्चिय केला की, या महत्त्वपूर्ण ब्लड बॅक्सचा मी छोटासा का होईना पण भाग बनणार. ह्रतिक रोशनने यावेळी कोकिलाबेन रुग्णालयाचे डॉ. राजेश सावंत, डॉ. रईस अहमद आणि डॉ. प्रांड्या यांचे आभार मानले.

हृतिकने त्याच्या पोस्टच्या शेवटी एक नोट लिहिली आहे. यात त्याने चाहत्यांना आपल्या स्टाईलने प्रश्न विचारले आहेत. तो म्हणाला की, ‘तुम्हाला माहित आहे का की, रक्तदान करणे हे रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे?’ हृतिकच्या या पोस्टवर फादर राकेश रोशन यांनी कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले की, मला आपल्या मुलाचा अभिमान आहे.

- Advertisement -

तर एका चाहत्याने ‘क्रिश’ या चित्रपटाशी या पोस्टचा संबंध जोडला आहे. या चाहत्याने लिहिले की, ‘ज्याला हे रक्त मिळेल तो क्रिश बनेल का?’ हृतिक रोशन सध्या त्यांची सिक्रेट गर्लफ्रेंड सबा आझादमुळे खूप चर्चेत आहे, त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास तो ‘विक्रम वेधा’ या तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये वेधाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खानही आहे. हा चित्रपट सप्टेंबर 2022 मध्ये रिलीज होण्याच्या तयारीत आहे. पुष्कर आणि गायत्री या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -