मोठ्या पडद्यावर गोविंदा- रवीनाची हीट जोडी लवकरच झळकणार

गोविंदा-रवीना यांचा प्रत्येक सिनेमा हिट ठरला होत. दोघांनी आपल्या अभिनयाने रुपेरी पडद्यावर अधिक चमक आणली होती.

bollywood iconic couple govinda and raveena tandon is coming back to silver screen
मोठ्या पडद्यावर गोविंदा- रवीनाची हीट जोडी लवकरच झळकणार

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon)आणि गोविंदा (Govinda)यांच्या जोडीने हिंदी सिनेसृष्टीत एक संपुर्ण काळ गाजवला होता. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. गोविंदा-रवीना यांचा प्रत्येक सिनेमा हिट ठरला होता. दोघांनी आपल्या अभिनयाने रुपेरी पडद्यावर अधिक चमक आणली होती. पण गेले अनेक वर्ष दोघेही कलाकार मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. चाहते दोघांनाही पुन्हा सिनेमात एकसाथ पाहण्यासाठी कमालीचे ऊत्सुक दिसत आहेत. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे दोघेही पुन्हा सिनेमात एकत्र काम करणार असल्याचे संकेत दिले आहे. रवीना टंडनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउटवरून अभिनेता गोविंदा सोबत सिनेमात स्क्रिन शेअर करणार असल्याचे सांगितले आहे. रवीनाने गोविंदा आणि तिचा एकत्र  फोटो शेअर करत लिहले आहे की, “ग्रँन्ड री-यूनियन…आम्ही पुन्हा स्क्रीनवर एकत्र झळकणार आहोत. पण कधी? केव्हा? कुठे? बस लवकरच कळणार आहे.”(bollywood iconic couple govinda and raveena tandon is coming back to silver screen)

रवीनाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांची फेवरेट जोडी पुन्हा एकदा मोठ्या स्क्रिनवर जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. रवीना-गोविंदा यांनी ‘बड़े मियां-छोटे मियां’, ‘दुल्हे राजा’, ‘अंखियों से गोली मारे’, ‘राजा जी’, ‘आंटी नंबर 1’ सारख्या अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. तसेच अनेक वर्षानी दोघांना एकत्र काम करतांना पाहणे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहेहे हि वाचा – आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर कंगनाने केला सवाल.. मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यासाठी धर्म का बदलावा?